BANNER

The Janshakti News

माळवाडी येथील पूरग्रस्तांच्या उपोषणाचा दुसरा दिवस... कडाक्याच्या थंडीत सुद्धा उपोषण कर्त्यांचे उपोषण पुढे सुरूच..



माळवाडी येथील पूरग्रस्तांच्या उपोषणाचा दुसरा दिवस...
कडाक्याच्या थंडीत सुद्धा उपोषण  कर्त्यांचे उपोषण पुढे सुरूच..

भिलवडी | दि.२८/१०/२०२१

पलूस तालुक्यातील माळवाडी येथे दिनांक २७ ऑक्टोबर पासून, सन २०१९ व २०२१ च्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या व अनुदानापासून वंचित राहिलेल्या पूरग्रस्तांचे उपोषण माळवाडी ग्रामपंचायतीच्या समोर सुरू  असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 


दि.२७ ऑक्टोबर रोजी दिवसभरामध्ये तालुका प्रशासनामधील  अधिकारी व पदवीधर आमदार अरुण (आण्णा) लाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या परंतु आंदोलनकर्त्यांच्या समस्येवरती कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे सदरचे उपोषण पुढे सुरूच राहिले आहे. 




उपोषणकर्त्यांनी काल रात्री कडाक्याच्या थंडीत सुद्धा आपले उपोषण पुढे सुरूच ठेवले आहे. सदरच्या उपोषणाला डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका , भिमशक्ती  संघटना पश्चिम महाराष्ट्र  , महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस तालुका व तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. आज दिवसभरामध्ये या उपोषणाची व आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने  दखल घेऊन योग्य तोडगा काढावा व   अनुदानापासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांना न्याय द्यावा..त्याचबरोबर आज दिवसभरात या आंदोलना बाबत प्रशासनाने योग्य तोडगा नाही काढल्यास हे आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी  चर्चा भिलवडी व माळवाडी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.