BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यात शेतकऱ्यांना घरपोच सातबारा उतारे देण्यास सुरुवात...





पलूस तालुक्यात शेतकऱ्यांना घरपोच सातबारा उतारे देण्यास सुरुवात...





भिलवडी | दि.०२/१०/२०२१

स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घरपोच सातबारा उतारा देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आला होता त्या अनुषंगाने आज २ ऑक्टोंबर रोजी पलूस तालुक्यातील नागठाणे भिलवडी सह  इतर गावांमध्ये प्राथमिक स्वरूपात शेतकऱ्यांना मोफत व घरपोच सातबारा उतारे देण्यात आले.



२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी  व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना घरपोच सातबारा उतारे देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली.


 नागठाणे येथे पलूसचे तहसीलदार मा.निवास ढाणे यांच्या हस्ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेतकऱ्यांना सातबारा उतारा देण्याचा प्राथमिक कार्यक्रम संपन्न झाला. भिलवडी येथील तलाठी गौसमहंमद लांडगे यांनी घरपोच सातबारा उतारा पोहोच करण्याचा उपक्रम हाती घेतला.



आज प्राथमिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना सातबारा उतारे देण्यात आले असून, लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना त्यांचे सातबारे घरपोच मिळतील अशी माहिती तहसीलदार मा.निवास ढाणे यांनी दिली.

 यावेळी भिलवडीचे तलाठी गौस महंमद लांडगे, नागठाणेचे तलाठी एन.आर.    आत्तार उपस्थित होते. विनासायास,ताटकळत उभे न राहता महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात घरी येऊन सातबारा उतारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.