BANNER

The Janshakti News

नागठाणे ता.पलूस येथे तहसीलदार मा.निवास ढाणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना केले अभिवादन....
नागठाणे ता.पलूस येथे तहसीलदार मा.निवास ढाणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना केले अभिवादन....

पलूस तालुक्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.नागठाणे येथे तहसीलदार मा.निवास ढाणे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पलूस : नागठाणे | दि. ०२/१०/२०२१

नागठाणे तालुका पलूस येथे दिनांक - ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारत देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिलेल्या या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस तहसिलदार मा. निवास ढाणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नागठाणे गावच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त, स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून तहसीलदार मा.निवास ढाणे यांनी अभिवादन केले. यावेळी वाळवा येथील डॉ.रणजित भोई यांनी कोरोनाच्या काळामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल, तसेच महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या संचालक पदी निवड झालेले दिलीप (आप्पा) कुलकर्णी यांचा व तलाठी पदावरून सेवानिवृत्त झालेले तलाठी अल्ताफ हुसेन लांडगे यांचा पलूसचे तहसीलदार मा.निवास ढाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 यावेळी नागठाणे गावचे सरपंच जगन्नाथ थोरात, अशोक पाटील, भिलवडीचे तलाठी गौसमहंमद लांडगे, नागठाणेचे तलाठी एन.आर.आत्तार, हणमंतराव पाटील, बाजीराव मांगलेकर, भगवान अडिसरे, संपतराव पाटोळे, रघुनाथ पाटील, जयकर पाटील, पंढरीनाथ जाधव, कुमार शिंदे, बाबासाहेब मुलाणी, प्रशांत पाटील, निवास माने, सुरज यादव, रफिक मुल्ला, खुदबुद्दीन वांकर तसेच स्व. बाबासाहेब लांडगे ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागठाणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.