BANNER

The Janshakti News

महानगपालिकेचा गलथान कारभार थांबवून नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा द्या अन्यथा न्यायालयात महानगरपालिके विरोधात दावा ठोकू.... संजय कांबळे......



महानगपालिकेचा गलथान कारभार थांबवून नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा द्या अन्यथा न्यायालयात महानगरपालिके विरोधात दावा ठोकू....         संजय कांबळे......

अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाचा इशारा...

सांगली : कुपवाड 
दि. १ ऑक्टोबर २०२१

अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांनी महानगरपालिकेतील चाललेला मनमानी, निष्काळजी आणि गलथान कारभार बंद करून नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा देण्यासाठी निवेदनातून   आयुक्त यांना कळविले की,
महानगरपालिकेतील कुपवाड प्रभाग समिती क्र.3 यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेले "गौतम बुद्ध" हौसिंग सोसायटी,बुधगाव रोड,मनपा जकात नाक्याच्या मागे(आधार बंगल्याच्या बाजूस) कुपवाड येथे गेले 25 ते 30 वर्षापासून नागरी वस्ती मध्ये महानगरपालिकेच्या नियमितकरणाचे तसेच कलेक्टर एनए चे कायदेशीर पैसे भरून आपल्या कुटुंबाच्या बरोबर काबाडकष्ट करून राहत आहेत.परंतु सदर भागात महानगरपालिका मार्फत आरोग्य विषयी तसेच अत्यावश्यक नागरी सुविधा अद्याप दिलेल्या नाहीत महानगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक वंचित ठेवलेले आहे. वारंवार महानगरपालिकेतील प्रभाग समिती क्र.3 चे सहा.आयुक्त सो,तसेच बांधकाम व आरोग्य विभागातील अधिकारी यांना लेखी कळविले आहे.सदर भागातील नागरिकांच्या कडून घरपट्टीच्या माध्यमातून स्वच्छता व आरोग्य तसेच सां.मि.कु ही महानगरपालिका "D" वर्गात असतानाही घनकचरा कर याच बरोबर विविध उपकराच्या नावाखाली पैसे भरून घेतले जात आहे. मात्र..

नागरी सुविधा दिल्या जात नाहीत.सदर नागरी वस्ती मध्ये गटारी,पक्के रस्ते नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर थांबून डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त होऊन त्रासलेले आहेत.श्रमिक कष्टकरी लोक असल्याने त्यांना हॉस्पिटलचे लाखोचे बिले भरणे शक्य होत नाही.त्यांना व्याजाने पैसे घेऊन औषधोपचार करावा लागत आहे. आरोग्याचा आणि जीवित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक व आर्थिक त्रास हा महानगरपालिका प्रशासनाच्या वेळखाऊ धोरणामुळे होत आहे.तसेच महानगरपालिकाच्या निष्काळजी पणामुळे व गलथान कारभारामुळे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.त्यांमुळे होणाऱ्या उपचार खर्च व डेंग्यू,मलेरिया,चिकन गुनिया या सारख्या डासाच्या उत्पत्ती पासून होणाऱ्या आजाराची टेस्ट  महानगरपालिकाच्या खर्चाने करण्यात यावे. खाजगी लॉब मध्ये विविध तपासणी साठी मोठ्या रक्कमा आकारून गोरगरिब श्रमिक कामगार वर्गातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.या सर्व अडचणीला महानगरपालिकेतील अधिकारी व प्रशासन जबाबदार आहेत.

तरी आपण वेळे न काढता पक्के रस्ते,आर.सी.सी.गटारी तसेच दैनंदिन आवश्यक नागरिक सुविधा पुरवाव्यात अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने आमच्या हक्कासाठी न्यायालयात आपल्या महानगरपालिका प्रशासनाच्या विरूध्द दावा दाखल करावा लागेल असा इशारा देण्यात आला. होणाऱ्या नुकसानीस महानगरपालिका जबाबदार असेल असे ही म्हणाले आहेत.
याचबरोबर राज्याचे मा.मुख्यमंत्री सो,आरोग्य  मंत्री सो, नगर विकास मंत्री सो,आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सो यांना ही निवेदना द्वारे कळवण्यात आले आहे.
यावेळी,अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, अनिल मोरे,वसंत भोसले,अनिल अंकलखोपे, अशोक लोंढे,अमित बनसोडे,विनित कांबळे,महाविर ऐवळे,हिरामण भगत,सर्जेराव सावंत,युवराज कांबळे,विक्रांत सादरे,ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.