महादेव माने यांच्या 'भगदाड' कथेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक....
भिलवडी | दि.०१/१०/२०२१
खंडोबाचीवाडी ता.पलूस येथील कथाकार महादेव तुकाराम माने यांच्या भगदाड या कथेस राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग दीपावली अंकाच्या वतीने स्व. आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील स्मृती राज्यस्तरीय कथा स्पर्धा घेण्यात आली.
या कथा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ७८ नामवंत कथालेखक सहभागी झाले.स्व.आमदार सा.रे.पाटील यांच्या जयंती दिनी शिरोळ येथे ११ डिसेंबर रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण होणार असल्याची माहिती संयोजक गणपतराव दादा पाटील यांनी दिली.
महादेव माने हे व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असून जिल्हा परिषद शाळा पाचावामैल ता. तासगांव येथे ते कार्यरत आहेत.त्यांच्या या यशाबद्दल खंडोबाचीवाडी गावचे नागरिक व साहित्यिक परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.