BANNER

The Janshakti News

आर. के. कंट्रक्शन (आर के टीम) यांच्यातर्फे स्वयंपुर्ती रक्तदान शिबिर संपन्न...





आर. के. कंट्रक्शन (आर के टीम) यांच्यातर्फे स्वयंपुर्ती रक्तदान शिबिर संपन्न...

भिलवडी | दि.12/10/2021

माळवाडी तालुका पलूस येथील आर. के. कंट्रक्शनचे इंजिनिअर  राजू चौधरी यांचा वाढदिवस बांधकाम कामगार व बांधकाम संबधीत व्यावसायिकांनी रक्तदान करून मोठ्या उत्साहात साजरा केला.


 चौधरी यांच्या  वाढदिवसानिमित्त 10 ऑक्टोबर रोजी  माळवाडी येथील आर. के. कंट्रक्शनच्या ऑफिस समोर भव्य मंडप उभा करून या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


ज्येष्ठ बांधकाम कामगार श्री. काशिनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.


आर. के. कंट्रक्शन चे इंजिनिअर राजू चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आर के कंट्रक्शन च्या टीमने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सध्या जिल्ह्यातील रुग्णालयात  रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राजू चौधरी यांनी आपला वाढदिवस रक्तदान शिबिर घेऊन साजरा केला. 





या रक्तदान शिबिरामध्ये 30 ते 35 बांधकाम कामगारांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.  एम.एस.आय.ब्लड बँक सांगली यांनी या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांची योग्य ती तपासणी करून रक्तदान करणाऱ्यांचे रक्त संकलन केले. 



इंजिनिअर राजू चौधरी यांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांना वाफेचे मशीन भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. भिलवडी व परीसरातील बांधकाम संबधित दुकानदार , ट्रेडर्स व्यवसायिकांनी  या रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले व राजू चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.