BANNER

The Janshakti News

माळशिरस : नातेपुते येथील पिरळे येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३० वी जयंती साजरी..




माळशिरस | दि. 09/09/2021

माळशिरस : नातेपुते येथील पिरळे येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३० वी जयंती साजरी..

आद्य क्रांतीवीर राजे उमाजीराव नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी या गावी ७ सप्टेंबर १७९१ रोजी झाला होता.  मराठे शाहिच्या उत्तरार्ध पेशवाई बुडाल्यानंतर भारतावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला होता. तेव्हा आद्य क्रांतिवीर , खंडोबाचे भक्त राजे उमाजीराव नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले बंड पुकारले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गनिमी काव्याचा वापर करत या नरवीरांने   सर्व जाती धर्मांना एकत्रित करून इंग्रजांना सळो की पळो करून ठेवले होते. अशा या आद्य क्रांतिवीर राजे उमाजीराव नाईक यांची २३० वी. जयंती
माळशिरस तालुक्यातील मौजे पिरळे येथिल पिरळे चौक या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी  दहिगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच  अजित ( दादा ) शिरतोडे यांनी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पिरळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्ञानदेव शिंदे यांनी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण केले.
जयंतीनिमित्त गावातील शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरां सह समाज बांधव उपस्थित होते.