yuva MAharashtra माळवाडी (भिलवडी) गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा... सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्येची तलाठी पदावर नियुक्ती..

माळवाडी (भिलवडी) गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा... सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्येची तलाठी पदावर नियुक्ती..





माळवाडी (भिलवडी)  गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा...

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्येची तलाठी पदावर नियुक्ती..




भिलवडी | दि. 20/09/2021

माळवाडी तालुका पलूस येथील एका सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील कन्या कु. नयना निवास चव्हाण (सावळजकर) यांनी घरच्या आर्थिक परस्थितीवर मात करीत मनामध्ये जिद्द बाळगून परीवारातील सर्वांच्या सहकार्याने व आशिर्वादाने स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले. नुकतीच त्यांची  तलाठी या पदावर नियुक्ती झाली आहे. कु.नयना निवास चव्हाण यांची तलाठी या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल माळवाडी ग्रामस्थांच्यावतीने माळवाडी येथील लक्ष्मी मंदिरामध्ये सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग व माळवाडी येथील धडाडीचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते दिवंगत गजानन (भाऊ) मोहिते यांच्या पत्नी श्रीमती आशाताई गजानन मोहिते यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित तलाठी कुमारी नयना निवास चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी माळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शिवाजी गायकवाड , हनुमंत नलवडे , सौ.अर्चना तावरे , संपत सोनवले , माजी सरपंच जनार्दन साळुंखे , नाभिक समाजाचे सांगली जिल्हा अध्यक्ष आर.के. रोकडे , उद्योजक संजय जाधव , संभाजी भोळे पाटील , सेवानिवृत्त पोलीस मारुती पुजारी ,  DPI चे पलूस तालुका उपाध्यक्ष शंकर सुपनेकर ,सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे आयोजक मा.प्रताप पुजारी  , विलास शिंदे (चेअरमन) , सखाराम मोरे , संभाजी शिंदे , लक्षण पुजारी ,  भरत गायकवाड , महेश कांबळे , सचिन हराळे , राजेंद्र रुपटक्के , योगेश सुपनेकर , हरी काटे , संजय सोनवले , अमित तावरे ,सुरेश सुपनेकर , सागर सोनवले व  कै.गजानन (भाऊ) मोहिते युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते ,  यांच्यासह माळवाडीतील  ग्रामस्थ उपस्थित होते. 


यावेळी या सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग ,  नाभिक समाजाचे सांगली जिल्हा अध्यक्ष आर.के.रोकडे व उद्योजक संभाजी भोळे पाटील यानी आपले मनोगत व्यक्त केले.


 यावेळी बोलताना कु. नयना  निवास चव्हाण यांनी उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थित नागरिकांचे आभार मानले व पुढे बोलताना म्हणाल्या की आज मला इतके मोठे यश मिळाले आहे. व माझी तलाठी या पदावर नियुक्ती झाली आहे. याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडीलांसह माझ्या परीवारातील सर्वांनाच जाते कारण त्यांच्या सहकार्याशिवाय मी इथं पर्यंत पोचूच शकले नसते. 


माझी जिद्द आणि चिकाटी, व माझ्या आईवडिलांसह माझ्या परिवारातील सर्वांचे कष्ट यामुळे तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल व माझ्या परीवाराबद्दल असलेली आपुलकी यामुळे आज या  ठिकाणी माझा इतका मोठा सत्कार होत  आहे. मी माझ्या कर्तव्यात कुठेही कसूर न करता मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन.यावेळी 




 उपस्थित सर्व मान्यवरांनी व नागरिकांनी कु.नयना निवास चव्हाण यांचा  सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व सूत्रसंचालन  भाऊसाहेब रुपटक्के यांनी केले.तर प्रताप पुजारी यांनी   मान्यवरांचे व उपस्थित नागरिकांचे आभार मानले..