BANNER

The Janshakti News

आमनापूर कृष्णा नदीवरील संरक्षक ग्रील कठडे तात्काळ दुरुस्त करा ; विशाल तिरमारे.





आमनापूर कृष्णा नदीवरील संरक्षक ग्रील कठडे तात्काळ दुरुस्त करा ; विशाल तिरमारे.

पंधरा दिवसात दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास आरपीआय कृष्णा नदी पुलावर आंदोलन करणार...




पलूस दि. 21 / 09 / 2021

 पलूस तालुक्यातील आमनापूर येथील कृष्णा नदीच्या पुलावरील सरंक्षक ग्रील कठडे महापुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय पलूस येथे निवेदन देऊन दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. 


पंधरा दिवसात दुरुस्ती चे काम सुरू न झाल्यास कृष्णा नदीच्या पुलावरती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल नागरिक ये जा करताना कोणत्याही नागरिकांची जीवित हानी झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे यांनी दिला.


यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की,पलूस तालुक्यात नदीकडेला असलेल्या घरांचे, नदीवरील पुलांचे महापुराच्या पाण्याने प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते.आमनापूर नदीचा पूल पाण्याखाली गेला असल्याने नदीच्या प्रवाहावामुळे संरक्षक ग्रील कठडे वाहून गेले आहेत.संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.ये जा करणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याने येथे भविष्यात पुलाला सरंक्षक भिंत नसल्याने जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. 


प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन दुरुस्ती तात्काळ करून घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी असा इशारा आरपीआय च्या वतीने देण्यात आला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष शितल मोरे,RPI मुस्लिम आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर,मुस्लिम आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष सलमान पठाण,विजय कांबळे,किरण सदामते निवेदन देताना उपस्थित होते.