BANNER

The Janshakti News

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय पलूस येथे विविध उपक्रमानी हिंदी दिवस संपन्न .......

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय पलूस येथे विविध उपक्रमानी हिंदी दिवस संपन्न ..                  पलूस | 14/09/2021

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयामध्ये हिंदी दिवस कार्यक्रम विविध उपक्रमांनी संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंदराज विद्यालय शाळगाव येथील हिंदी विषयाचे शिक्षक कवी निवांत कवळे,मुख्याध्यापक टी.जे. करांडे ,सौ.पी.व्ही. नरुले ,बी.डी.चोपडे ,व्ही.पी.  कांबळे   विद्यार्थी  उपस्थित होते.


    सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले भारती परिवारातील बक्षीस विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कु.संचिता शिंदे, जान्हवी कोळी, समृद्धी चव्हाण, प्रज्ञा ऊनउने, उत्कर्षा कुंभार यांनी हिंदी भाषा  बद्दल मनोगत व्यक्त  केले.
   
  मुकुंदराज विद्यालय शाळगाव येथील हिंदी विषयाचे शिक्षक कवी निवांत कवळे यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले .हिंदी जगामध्ये कशी श्रेष्ठ आहे त्याची विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यांच्या दस्तक ह्या हिंदी  काव्यसंग्रहातील कविताचे ही त्यांनी वाचन केले.


   मनोगतामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जे. करांडे  यांनी हिंदी भाषा किती सोपी आहे. आपण दैनंदिन कामकाजात उपयोग केला पाहिजे व हिंदी भाषांमधून साहित्य निर्मिती केली पाहिजे असे सांगितले.


   स्वागत व प्रास्ताविक हिंदी विषय शिक्षक बाळासाहेब चोपडे यांनी केले. सूत्रसंचालन विकास कांबळे  यांनी केले आभार सौ.पी.व्ही. नरुले  यांनी मानले. हिंदी दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या आवारामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.