BANNER

The Janshakti News

साई माऊली उद्योग समूह वारणानगर येथील कैलास पर्वतावरील धबधबा, श्री गणेश गौरी शिवलिंग देखावा..

भिलवडी | दि. 14/09/2021

श्री गणेश चतुर्थी
     भाद्रपद शुद्ध ४दिवशी श्री गणेशाची स्थापना करतात.
गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी,    
    १) गौरीचे आगमन होत असते. ( ऐकीव माहिती अशी की श्री गणेश बाळाला घेऊन जाण्यासाठी पार्वती माता गौरीच्या रूपांत येते.) सासरवाशी असणार्या मुली माहेरी येतात. व नदीवरून गौरीचे " नव्हान " म्हणून वाजत-गाजत आणतात अंघोळ घालतात त्यादिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य देतात.

    २) दुसऱ्या दिवशी  शंकरुबा आणतात, गंगा गौरीला साडी नेसवतात व शंकरुबा  पोशाख करतात गोड नैवेद्य खिर, पोळीचा देण्याची पद्धत आहे, त्यानंतर रात्रीच्या वेळी गाणी म्हणून ववसा घेतात व कान उघडताना  "भानीर वादन" करून गाणी म्हणत_म्हणत  "कान" उघडतात व  "मंगळा गौरीचीओटी भरतात" रात्रभर झिम्मा फुगडी खेळत जागरण करतात. 


    ३) तिसऱ्या दिवशी गौरी गणपती विसर्जन म्हणून सायंकाळी वडी, धपाटे, तळीव, भाजीच्या प्रसादाने नैवेद्य दाखवून  "गौरीचे व गणपतीचे विसर्जन" नदी किंवा विहिरीवरती वाहत्या पाण्यामध्ये करण्याची परंपरा आहे.