BANNER

The Janshakti News

महालसीकरण अभियानास भिलवडी परिसरात चांगला प्रतिसाद...



महालसीकरण अभियानास भिलवडी परिसरात चांगला प्रतिसाद...

भिलवडी प्रा.आ.केंद्राअंतर्गत ३,३७१ (दि.२२ ते २४ सप्टेंबर ) लसीकरण..



भिलवडी | दि. 25/09/2021

भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधक महालसीकरण अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला.दि.२२ ते २४ सप्टेंबर या तीन दिवसांत एकूण ३,३७१  लोकांनी लसीकरण करून घेतले.


बुधवार दि.२२ सप्टेंबर ते शुक्रवार दि.२४ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये  प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण महा अभियान राबविण्यात आले. यामध्ये भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भिलवडी सह, उपकेंद्र माळवाडी , अंकलखोप , वसगडे ,  नागठाणे , आमणापूर , धनगांव , बुर्ली , या गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या मोहिमे अंतर्गत नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला.


माळवाडी येथे ' हनुमान मंदिर ' व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (पाण्याची टाकी) या ठिकाणी ग्रामस्थांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.माळवाडी येथील एकूण ९६७ ( तीन दिवसांमध्ये ) ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला. 
सदरच्या तीन दिवसांमध्ये भिलवडी येथील १४७ , धनगांव येथील १९९ , नागठाणे येथील १०७५ , आमणापूर येथील २६५ , बुर्ली येथील ४६०  अंकलखोप येथील २३० ,  वसगडे २८ ,   अशाप्रकारे भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये एकूण ३,३७१ नागरिकांनी लसीकरण करून घेऊन , प्रशासनाच्या महालसीकरण अभियानास चांगला प्रतिसाद दिला.


दरम्यान पलूस तालुका गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रागिणी पवार,  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र पवार, यांनी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावांमध्ये लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन नागरिकांना लसीकरण करून घेण्याबाबत प्रोत्साहन दिले. या लसीकरण मोहिमेसाठी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सह सदर सर्व गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , सदस्य ,अंगणवाडी सेविका , आशा स्वयंसेविका , शिक्षण विभागातील शिक्षक , सामाजिक कार्यकर्ते  यांनी मोलाचे सहकार्य केले. 


त्याच बरोबर माळवाडी  गावात २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर  दरम्यान झालेल्या लसीकरण मोहिमेला माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच - सुरैया तांबोळी, उपसरपंच - आजिंक्यकुमार कदम , ग्रा.पं. सदस्य विशाल नलवडे , सौ. अर्चना तावरे , सौ.भाग्यश्री वायदंडे , संपत सोनवले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील तावदर , राजकुमार बिराजदार व त्यांचे सहकारी ,व हेमंत काटे यांनी  आपल्या गावातील नागरिकांचे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घेण्याबाबत प्रयत्न करून आरोग्य विभागाला सहकार्य केले.


परिसरातील शाळेमधील  शिक्षक, आरोग्य केंद्रातील  स्टाफ व आशा सेविका यांनी रजिस्ट्रेशन करणेकामी या महालसीकरण मोहिमेत सहभाग घेतला.
भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील १८ वर्षाच्या पुढील जे नागरिक  लसीकरणा पासून वंचित राहिले आहेत अशा लोकांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र पवार यांनी केली आहे.