BANNER

The Janshakti News

मोठ्यांना जमणार नाही ते चिमुकल्यांनी करून दाखविले...



मोठ्यांना जमणार नाही ते चिमुकल्यांनी करून दाखविले...

 बेकरीत काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील  गुरुप्रसाद व त्याच्या लहान चिमुकल्या मित्रांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनाच अभिमान वाटेल असे अस्मरणीय कार्य केले आहे...

कोल्हापूर | दि. 25 / 09 / 2021

कोरोना ह्या महाभयंकर रोगाने आपल्या देशासह संपूर्ण जगात थैमान घातले आहे. गेल्या दोन वर्षापासून या कोरोना महामारीमुळे काही लोक मृत्युमुखी पडले तर काही लोक मृत्यूशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी करोना महामारीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लाँकडाऊन केल्याशिवाय शासनाला पर्याय नव्हता. कोरोना हा रोग वाढू  नये त्याला आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम चालू केली. 
या सर्व परस्थितीमधे कोरोनाने मानसाला  जगायचे कसे हे शिकवून दिले. माणसातला माणुस जागा केला. अगदी लहाना पासुन ते मोठ्या पर्यंत. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाचे डॉक्टर्स , नर्स , आरोग्य कर्मचारी , प्रशासकीय अधिकारी , पोलीस प्रशासन व काही सामाजिक संघटना सातत्याने या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांना धीर देण्याचे व लोकांना जगविण्याचे काम करीत होते. 


अशा या महाभयंकर परस्थितीत आपली सामाजिक बांधिलकी जपत आपल्या जीवाची बाजी लावून  आपल्या परिवाराची काळजी न करता तन-मन-धन या अर्थाने काम करीत होते.  कोरोनाच्या  काळामध्ये कोरोनाच्या विरोधात लढत होते अशा या लोकांच्या साठी आपण देखील काहीतरी करावे असे या चिमुकल्यांना वाटले. 
या विचारानेच कुमार गुरुप्रसाद नरके रा. कंळबा ( ठाणे साळोखे गल्ली कोल्हापूर ) इ.१० वी.  आई शेती करते १  लहान बहिण आहे. वडिल नाहित  पण ह्या लहान वयात शाळा शिकत बेकरी मधे काम करतो, आईला छोटे मोठे काम करु लागतो त्यातुन आपली परिस्थिती नसताना आपण काहि तरी केले पाहिजे या हेतुने व डोळ्या पुढचे दृश्य पाहून त्याच्या स्वतःच्या मनाला वाटले कि ज्यांनी कोरोना मधे स्वताची व परीवाराची पर्वा न करता काम करत आहेत. व दुसऱ्यांना मदत करतात तर त्याना हि आपण शाब्बासकी दिली पाहिजे आपण हि कौतुक केले पाहिजे या उद्देशांने गुरु प्रसाद यांने लहान मुलांचे एक  मंडळ स्थापन करुन तसेच स्वताचे पैसे घालुन तसेच मित्रा मित्रांची पट्टी काढुन त्याने श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज ग्रुप कंळबा या नावाने मंडळ स्थापन केले. 


स्वतःचे व लहान चिमुकल्या मुलांच्या कडून वर्गणी गोळा करून जमा केलेल्या पैशातून ट्रॉफी खरेदी करून त्या ट्रॉफी वरती कोविड योध्दा  पुरस्कार असे ब्रीद वाक्य लिहून ज्या ज्या लोकांनी कोरोनाच्या  काळामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे अशा लोकांच्या घरी जाऊन हे चिमुकली मुले त्यांना कोविड योध्दा पुरस्कार देत आहेत.  कोरोनाच्या काळात चांगली कामगिरी करणारे सामाजिक कार्यकर्ते
 1) मा सौ, रेणु पोवार 2) श्री बजरंग टिपुगडे
3) श्री ओमकार नरके 4) श्री संपत नरके यांना  कोविड योद्धा पुरस्कार चे सन्मान चिन्ह देऊन सामाजिक बांधिलकी जपली. हे सर्व दृश्य पाहून सामाजिक कार्यकर्त्या रेणू पवार यांचे अश्रू अनावर झाले . 


त्या काय म्हणाल्या  पहा.
 खरच किती मोठ कौतुक आहे जे मोठ्याना जमंत नसत ते लहानानी करुन दाखवले. मराठी मध्ये एक म्हण आहे " लहान मुले ही देवाघरची फुले असतात " तर याच लहान मुलानी आम्हास ही फुले देऊन आमचे त्याने कौतुक केले. लहान मुलांचे हे कौतुक पाहून हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे व अश्रू सुद्धा मोती बनले या लहान मुलांचा आदर्श घ्यावा इतका कमी आहे. त्यामुळे या लहान मुलांची शासन दरबारी सुद्धा यांचे कौतुक झाले पाहिजे असे वाटते.यावेळी शिवछत्रपती ग्रुप चे छोटे मावळे गुरुप्रसाद नरके , साहिनाथ नरके
ओम पोवार , आर्यन , शुभम चौगुले , भैया
उपस्थित होते.


हा अगळा वेगळा उपक्रम पाहण्यास मिळाला आज पर्यत कार्यालयात किंवा मांडव घालुन पुरस्कार देतात पण गुरुप्रसाद व त्याचे सोबती मित्र यानी मनाची बाजी मारून घरगुती जाऊन कोविड योद्धा यांना पुरस्कार ट्राँफिक देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या रेणू पवार यांनी.. 
 गुरुप्रसाद व त्याचे मित्र या सर्वाना उदंड आयुष्य लाभो  असा अशिर्वाद देऊन सर्व चिमुकल्यांचे  कौतुक करुन अभिनंदन केले...

आपल्या गरीब परस्थितीवर मात करुन सामाजिक बांधिलकी जपत गुरुप्रसाद व त्याच्या सर्व मित्रांनी जे सामाजिक कार्य सुरू केले आहे त्याबद्दल या सर्व चिमुकल्यांना     " द.जनशक्ती न्यूज "     चा        " सलाम "   व पुढील कार्यास शुभेच्छा....!