BANNER

The Janshakti News

बुर्ली येथील खोत कुटुंबियांनी मयत मुलीचे मरणोत्तर केले नेत्रदान...

बुर्ली येथील खोत कुटुंबियांनी मयत मुलीचे मरणोत्तर केले नेत्रदान...

बुर्ली गावातील पहिले नेत्रदान...





भिलवडी | दि.10/09/2021

बुर्ली येथील खोत कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत,धाडसी निर्णय घेवून स्व.कल्पना खोत यांचे मरणोत्तर नेत्रदान केले.जायंट्स ग्रुप भिलवडीच्या वतीने खोत कुटुंबियांना प्रमाणपत्र देवून ऋण व्यक्त करण्यात आले.
बुर्ली ता.पलूस येथील स्व.कल्पना श्रीपाल खोत यांचे मरणोत्तर नेत्रदान भिलवडी जायंट्स ग्रुप आणि डॉ.दिलीप पटवर्धन यांच्या नंदादीप हॉस्पिटलच्या सहकार्याने झाले. बुर्ली येथे झालेले हे पहिले नेत्रदान स्व.कल्पनाच्या आई सौ.विलासमती खोत, वडील श्रीपाल खोत व खोत कुटुंबियांच्या पुढाकाराने झाले.कल्पना श्रीपाल खोत यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले.निधनानंतर त्यांचे वडील श्रीपाल बळवंत खोत यांनी आपल्या कन्येचे मरणोत्तर नेत्रदान केले. कल्पना यांच्या नेत्रदानामुळे दोन अंधांचे अंधारमय जीवन प्रकाशमय होणार आहे.


नंदादिप हॉस्पिटल सांगलीचे डॉ. दिलीप पटवर्धन डॉ. के.ऐश्वर्या यांनी नेत्रदानाचा स्विकार केला.भिलवडी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील परीट, जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी तसेच उद्योगपती गिरीश चितळे यांनी खोत कुटुंबियांच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून,त्यांना समारंभपूर्वक प्रमाणपत्र देऊन ऋण व्यक्त केले.


यावेळी डॉ. जयकुमार चोपडे यांनी नेत्रदानाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली तर गिरीश चितळे यांनी स्व.कल्पनाच्या नेत्रदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आदरांजली अर्पण केली. डी.आर.कदम यांनी आदरांजली पत्राचे वाचन करून कुटुंबियांचे आभार मानले, यावेळी जायंट्स ग्रुपचे सुहास खोत, राजेंद्र कुलकर्णी, डॉ राजेंद्र शेंडगे, रामचंद्र दिक्षित, डॉ. चंद्रशेखर माने, संतोष खोत, दीपक खोत, मेजर शेख, संजय आंबी, संजय चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.