BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यातील अवैद्य व्यवसाय बंद करा.. ह्युमन राईट्स असो. फॉर प्रोटेक्शनची मागणी...


पलूस तालुक्यातील अवैद्य व्यवसाय बंद करा.. ह्युमन राईट्स असो. फॉर प्रोटेक्शनची मागणी...

लवकर पायबंद न घातल्यास राज्य मानवी हक्क आयोगाकडे मागणार दाद...




पलूस | दि. 19/09/2021

पलूस तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर, अवैैद्य व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागण्यात येईल असा इशारा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने देण्यात आला आहे.
पलूस तालुक्यातील गावांमध्ये व पलूस शहरात छुप्या पध्दतीने अवैद्य मार्गाने मटका, जुगार, गुटखा, बेकायदेशिर दारू, वाहतुक व इतर अवैद्य धंदे सुरू असून, सदर व्यवसाय हे पलूस पोलिस ठाणेच्या वरदहस्ताने राजरोस सुरू आहेत. अवैद्य व्यवसायातून मिळणाऱ्या बेमाप पैशातुन मटका बुकी चालक, दारू व्यवसाय धारक, खाजगी सावकारीसह इतर अवैध व्यवसाय करित आहेत. त्यांनी अनेकांच्या गाडया, जमिनी बळकाविल्या आहेत. यातुन गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत.


अवैद्य व्यवसायामुळे गुन्हेगारी जगताचा उदय होऊन सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तसेच अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. सबब पलूस शहर व पलूस तालुक्यातील सर्व गावातील अवैद्य धंदे तात्काळ बंद करावेत अशा आशयाचे लेखी निवेदन पलूसचे तहसीलदार निवास ढाणे व पलूस पोलिस ठाणे यांना देण्यात आले.सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य ते आदेश व्हावेत अन्यथा संघटनेमार्फत राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणेत येईल, होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घेणेत यावी.असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.संबधीत निवेदनाची प्रत गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन, सांगली जिल्हाधिकारी, पलूस तहसिलदार,पलुस पोलीस ठाणे, पलूस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.पलूस तहसीलदार यांना निवेदन देते वेळी

संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम, सांगली जिल्हाध्यक्ष दिपक भोसले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.