BANNER

The Janshakti News

सांगली जिल्हा सहा.कामगार आयुक्त अनिल गुरव यांचा अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाने केला सत्कार...

सांगली जिल्हा सहा.कामगार आयुक्त अनिल गुरव यांचा अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाने केला सत्कार...



सांगली 
दि.१३ सप्टेंबर २०२१

सांगली जिल्ह्यासाठी सहा.कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांनी कायम पदभार घेतल्यानंतर गोरगरिब, कष्टकरी, श्रमिक बांधकाम क्षेत्रातील कामगारांची सामाजिक व त्यांच्या मुलांचे शैक्षणिक उन्नती व्हावी म्हणून त्यांनी कामगारांच्या वेळेचा विचार करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांनी केलेल्या मागणी नुकसान वेळेत कल्याणकारी लाभ मिळावेत या दृष्टिकोणातून बांधकाम कामगारांची नोंदणी व विविध लाभांचे अर्ज ऑनलाईन नोंदणी सुरू करून कामगारांची होणारी पिळवणूक थांबवली आहे. 

अनेक लाभदायक कल्याणकारी निर्णय घेऊन बांधकाम कामगारांना योग्य न्याय देण्याचे त्यांनी  प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे त्याप्रमाणे  गंभीर आजार कॅन्सरग्रस्त झालेले सुतार कामगार जावेद आब्दुल आलासे यांच्या उपचारासाठी कल्याणकारी योजनेतून तात्काळ 1 लाख आर्थिक मदत देऊन त्यांना सहकार्य केल्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत  झालेल्या कुटुंबाला मायेचा आधार मिळाला.

तसेच कष्टकरी श्रमिक बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठीण हि मदत मंजूर करून कामगारांच्या मुलांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न मंडळाच्या मार्फत पूर्ण केले आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगार हा श्रीमंता पासून ते सर्वसामान्य करिता निवारा बांधण्यासाठी आपले आयुष्य काबाडकष्ट करतो मात्र त्याला हक्काचे पक्का निवारा घर मिळत नव्हते ते ही त्यांचे स्वप्न सहा.कामगार आयुक्त मा.अनिलजी गुरव साहेब यांनी कल्याणकारी मंडळाच्या मार्फत पूर्ण केले आहे.तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व होणारा धोका व कामगारांची अडचण लक्षात घेऊन मंडळाच्या मार्फत दोन टाईम बांधकाम कामगारांना जेवणाची सोय केली असल्यामुळे,ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा मार्फत मा.कामगार आयुक्त अनिलजी गुरव साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले.तसेच त्यांच्या पुढील विधायक कामाच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन, त्यांचा लाभ प्राप्त झालेल्या बांधकाम कामगारांना घेऊन सत्कार करण्यात आला.
  त्यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,सांगली जिल्हाध्यक्ष संजय भूपाल कांबळे तसेच जिल्हा जनरल सेक्रेटरी संजय संपत कांबळे,जिल्हा सदस्य युवराज कांबळे,वसंत भोसले,विक्रांत सादरे,अनिल आंखलखोपे,सहदेव कांबळे,शिवकुमार वाली,कुमार सुतार,संजय चव्हाण, संतोष माने,यांच्या बरोबरच गंभीर आजाराने ग्रस्त असणारे सुतार कामगार जावेद अब्दुल आलासे व त्याच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.