BANNER

The Janshakti News

माळशिरस : दहिगाव येथे ११ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...

माळशिरस : दहिगाव येथे ११ सप्टेंबर २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...


माळशिरस : दहिगाव दि. 09/09/2021

दहिगाव ता- माळशिरस येथे कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणऊ नये म्हणून  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त साक्षर दिन आणि गणपती उत्सव निमित्ताने दहिगाव येथे दिनांक -११ सप्टेंबर २०२१ वार - शनिवार वेळ सकाळी- ०९:०० वाजल्यापासून दुपारी-०३:०० येथे ....

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान - अलंकापुरी, राजे उमाजी नाईक संघटना - पिराळे , भारतीय मातंग युवक संघटना -दहिगाव ,भुई समाज विकास संघ - धर्मपूरी, महाराष्ट्र पोलीस पत्नी संघ व पोलिस मित्र संघटना - माळशिरस तालुका, नारीशक्ती संघटना - मोरोची, जैन विचार मंच - महाराष्ट्र राज्य ,मदत प्रतिष्ठान - दहिगाव व दहिगाव गटातील विविध संघटनेंच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

शिबीर  दहिगाव ता- माळशिरस ( वालचंदनगर- नातेपुते रोड) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक पवार कॉम्प्लेक्स येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.व अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा - ७७०९०२३५६३ , ९९७०२०००६४, ८९७५१८४५६३ , ९७६८८४४२६३ , ७०५८८४६७३०
 व जास्तीत जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे.असे आव्हान दहिगाव ग्रामस्थांनी व सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.श्रेष्ठदान.. रक्तदान..