BANNER

The Janshakti News

आर.पी.आय.(आठवले) मिरज शहर प्रमुख पदाधिकार्यांची आठावा बैठक उत्साहाने संपन्न.


मिरज | दि. २९ / ०८ / २०२१

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) मिरज शहर कार्यकारणी यांचे वतीने मिरज शहरातील सर्व आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांची आठावा बैठक
 मिरज शहरातील नामवंत हॉटेल ३ज् येथे आयोजित करणेत आली होती.

रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विवेकरावजी कांबळे साहेब, प.महा. प्रदेश सरचिटनीस मा. जगन्नाथदादा ठोकळे साहेब व युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. अशोकरावजी कांबळे साहेब यांचे आदेशाप्रमाणे बैठकीचे आयोजन करणेत आले होते.

प्रथम रिपाइं आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे यांनी प्रास्तविक केले व बैठकीस उपस्थित असणार्या पदाधिकार्यांचे स्वागत केले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे वतीने राबवण्यात आलेल्या विवीध आंदोलने, निदर्शने, जनकृल्यानार्थ राबवलेल्या कार्याचा आठावा घेणेत आला. तसेच येणार्या आगामी काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राजकीय धोरण व स्थानिक निवडणूक कार्यक्रमाची भूमिका या विषयावर रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते मा. श्वेतपद्म विवेक कांबळे यांनी मार्गदर्शन केले व मा. श्वेतपद्म कांबळे पुढे म्हणाले रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वच जाती धर्माचा युवा वर्ग मोठ्यासंख्येने सामील होत असताना दिसत आहे. या युवा वर्गाची दाद पक्षाने घेऊन त्यांचा सन्मान करावा. जेने करून पक्षाच्या बळकटी मध्ये आणखी बळ मिळेल.

यावेळी आठावा बैठकीचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटनीस मा. डॉ. रविकुमार गवई, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष मा. पोपटभाऊ कांबळे, मिरज शहर अध्यक्ष मा. अविनाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

    यावेळी रिपब्लिकन व्ही.जे.एन.टी. आघाडीचे प.महा. अध्यक्ष मा. सतिश जाधव, मिरज तालूकाध्यक्ष मा. अरविंद कांबळे, युवक तालूकाध्यक्ष मा. नंदू कांबळे, सांगली शहरजिल्हा सचिव मा. नितेश वाघमारे, महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष मा. संतोष जाधव, रिपब्लिकन एल्प्लॉइज फेडरेशनचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. मारूती धोतरे, मिरज शहर सरचिटनीस मा. सिद्धार्थ कांबळे,  मिरज शहर प्रभारी तथा उपाध्यक्ष मा. शानूरभाई पानवाले, मिरज शहर कार्याध्यक्ष मा. हरिष कोलप, मिरज शहर उपाध्यक्ष मा. सुनिल(मिठ्ठू) माने, युवक मिरज शहर अध्यक्ष मा. संदिप दरबारे, मिरज शहर सहा. संघटक मा. हरीभाऊ सातपूते, रिपाइं चे जेष्ठ प्रवक्ते मा. कबीरमामू, रिपाइं सदस्य मा. पृथ्वीराज रांजणे, मा. संतोष कांबळे, मा. अविनाश साठे यांचे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.