BANNER

The Janshakti News

माळवाडी ता.पलूस येथील ( अनु-जाती ) लोकवस्तीच्या जवळ असणाऱ्या दलदलीत मगरीचे दर्शन.... ग्रामपंचायत प्रशासन व वनविभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष...भिलवडी | दि. २९ / ०८ / २०२१

माळवाडी ता. पलूस येथील (अनु-जाती) लोकवस्तीतील नागरिकांना (अनु-जाती) लोकवस्तीच्या अगदी जवळ असलेल्या मोठ्या डबक्यात महापुराच्या पाण्यातून आलेल्या मगरीच्या पिल्लाचे गेल्या अनेक दिवसांपासून दर्शन होत आहे.

जुलै २०२१ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यातून अंदाजे तीन फूट लांबीचे मगरीचे पिल्लू माळवाडी येथील (अनु-जाती) लोकवस्तीला लागूनच असणाऱ्या मोठ्या डबक्यामध्ये असल्याचे येथील स्थानिक लोकांना गेल्या पंधरा दिवसापासून आढळून येत आहे. (अनु-जाती) लोकवस्तीच्या मध्यभागी खाणीसारखे हे फार मोठे डबके आहे.या खाणीच्या चारी बाजूने (अनु-जाती) मधील लोकांची घरे आहेत. याच ठिकाणी या भाागाातील लोकांची जनावरे देखील बांधली जातात.त्याचबरोबर सार्वजनिक शौचालय देखील याच ठिकाणी आहे.  येेेथील सर्वच नागरिकांची व लहान मुलांची या ठिकाणी दिवस-रात्र वर्दळ असते. त्यामुळे येथील लोकांना या मगरीचा फार मोठा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी या वस्तीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या मगरीच्या पिल्लाचा बंदोबस्त करा असे वन विभागाच्या धिकार्‍यांना व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते.परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये ग्रामपंचायतीने सदर ठिकाणी जेसीबी पाठवून देऊन तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मगरीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला होता.परंतु काही कारणाने तो प्रयत्न असफल ठरला.
ज्या ठिकाणी मगरीचे पिल्लू आढळून आले होते त्या डबक्यातील पाणी व गाळ जेसीबीच्या साह्याने उपसा केल्यामुळे ते मगरीचे पिल्लू तेथून जवळच असलेल्या एका घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डबकामध्ये वास्तव्यास असल्याचे लोकांना आढळून येत आहे. या ठिकाणी  मगर असल्याची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून माळवाडी गावात होत आहे. परंतु माळवाडी ग्रामपंचायतीला व वनविभागातील अधिकाऱ्यांना याचे कोणतेही गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे.
या मगरीमुळे एखादी मोठी दुर्देवी घटना घडल्यानंतर माळवाडी ग्रामपंचायत व वनविभाग जागे होणार आहे का..? असा प्रश्न या ठिकाणच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. अशी मोठी दुर्दैवी घटना घडण्याअगोदर ग्रामपंचायत माळवाडी व वनविभागाने या मगरीचा तात्काळ बंदोबस्त करावा.. अशी मागणी माळवाडी येथील नागरिकांच्या मधून होत आहे...