BANNER

The Janshakti News

सशक्त भारतासाठी व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती आवश्यक.....सादिकभाई शेख(म्हाकवे येथे आधार व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती केंद्राचे उदघाटन)

कागल | दि. ३० / ०८ / २०२१

कागल:म्हाकवे ता कागल, येथे आधार फॉउंडेशन, व समर्थ सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, "आधार नशा मुक्ती व शुगर मुक्ती केंद्राची" सुरुवात करण्यात आली.
यावेळी 'व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियानाचे' मुख्य प्रवर्तक सादीकभाई शेख यानी सशक्त भारतासाठी व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती आवश्यक असून या दोन समस्यांनी आपला देश त्रस्त असून यातून लवकर मार्ग निघणे गरजेचे आहे.


म्हाकावे येथे आधार डिझास्टर रिस्पॉन्स कोर्स व व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती केंद्राने समाजाला यामधून बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नास यश यावे यासाठी माझे सर्व सहकार्य राहील असे सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी परिसरातील प्रतिभावान विद्यार्थी व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळजिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे टीम प्रमुख सुनील कांबळे,कृष्णा सोरटे यांचेसह सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,तलाठी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,माजी सैनिक,पत्रकार,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन आधार व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती केंद्राचे अध्यक्ष आशिष पाटील,उपाध्यक्ष सिताराम गोरे,सचिवपांडुरंग  पाटील,खजिनदार गजानन भोसले व संचालक मंडळांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून यशस्वी करण्यात आला.