BANNER

The Janshakti News

दिगंबर साळुंखे यांचा उदयोगामुख उद्योजक या पुरस्काराने गौरव...

दिगंबर साळुंखे यांचा उदयोगामुख उद्योजक या पुरस्काराने गौरव....

जत येथे २४ व्या ग्रामीणसाहित्य  संमेलनामध्ये प्रदान....


जत | दि. ३० / ०८ / २०२१

जत:मराठी साहित्य सेवा मंच व डॉ.बलभीम मुळे स्मृती फाऊंडेशन शेगाव,ओम साई प्रतिष्ठान शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील चिंच विसावा या कृषी पर्यटन स्थळी आयोजित केलेल्या ' २४ ' वे ग्रामीण साहित्य संमेलन ' २०२१' मध्ये...
वाटंबरे येथील दिगंबर साळुंखे यांना महादीप उद्योग समूहाच्या माध्यमातून अल्पावधीत उद्योग क्षत्रामध्ये आपले ' इन्स्टंट ढोकळा मिक्स' हे उत्पादन ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय करण्यात यश मिळविल्याबद्दल ' उदयोगामुख उद्योजक ' या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. संपतराव जाधव, दै. तरुणभारत चे शिवराज काटकर, दै. लोकसत्ताचे दिगंबर शिंदे,महाराष्ट्र टाइम्सचे नामदेव भोसले, साहित्यिक-कवी इंद्रजित घुले, संतोष जगताप,ज्योतीराम फडतरे,रशीद मुलाणी,रावसाह यादव, दिनराज वाघमारे,माणिक कोडगसर या साहित्यिकांचा सहभाग होता. 
यावेळी या साहित्य संमेलनाचे आयोजक साहित्य सेवा मंच चे अध्यक्ष किरण जाधव, डॉ.बलभीम मुळे फाऊंडेनचे लवकुमार मुळे, ओम साई प्रतिष्ठान चे समाधान माने,चिंच विसावा कृषी पर्यटन चे प्रल्हाद बोराडे यांचेसह बहुसंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते.कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करून हे संमेलन यशस्वीरीत्या पूर्ण केले.