yuva MAharashtra सांगली पॅटर्न - सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !! बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली पॅटर्न - सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !! बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे"

 


        सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या सांगली येथील सर्व संस्थेच्या बालगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्यासाठी, त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून दिवाळीच्या सजावटीच्या वस्तू तयार करण्यात येत असून त्याचे प्रदर्शन शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला सांगलीकरांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.


                  जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

             दिव्यांग विद्यार्थी व इतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीच्या सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्व सांगलीकरांसाठी  सुरू राहील. या विद्यार्थ्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून त्यांना आपल्या आधाराची व कौतुकाची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी कुटुंबासहित या प्रदर्शनास उपस्थित राहून, स्वतःच्या भविष्याच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या सांगलीमधील दिव्यांग व इतर विद्यार्थ्यांकडून दिवाळीचे साहित्य खरेदी करावे  व त्यांना स्वयंरोजगाराच्या वाटेवर चालण्याचा आत्मविश्वास द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰