भिलवडी दि. १० : पलूस तालुक्यातील भिलवडी येथील जेष्ठ नागरिक श्री. शिवराम शंकर परीट (वय 103 वर्षे) यांचे शनिवार, दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनानंतर त्यांचे सुपुत्र — जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे माजी अध्यक्ष सुनील शिवराम परीट यांनी आपल्या वडिलांचे नेत्रदान करून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण घातले.
हे नेत्रदान सांगली येथील डॉ. पटवर्धन हॉस्पिटल यांनी स्वीकारले. शिवराम परीट यांच्या मृत्यू पश्चात अशा पवित्र कार्याबद्दल त्यांचे सुपुत्र सुनील परीट यांना आज शुक्रवार दि. १० ऑक्टोंबर रोजी जायंट्स वेलफेअर फेडरेशन २-क. चे स्पेशल कमिटी मेंबर व जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे मार्गदर्शक, गिरीश चितळे यांच्या हस्ते “नेत्रदान सन्मानपत्र” प्रदान करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध कवी डॉ. दीपक स्वामी, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे , जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष सुबोध वाळवेकर, बाहुबली चौगुले, राजेंद्र तेली, भगवान शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीमार्फत हे 205 वे नेत्रदान संपन्न झाले असून, समाजात नेत्रदानाबद्दल जागरूकता निर्माण करणारे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰