सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समितीमधील सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, तहसीलदार (सर्वसाधारण) लिना खरात आदि उपस्थित होते.
आरक्षण सोडतीनुसार पंचायत समितीनिहाय सभापती आरक्षण पुढीलप्रमाणे. खानापूर-विटा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), मिरज – अनुसूचित जाती (स्त्री), कवठेमहांकाळ – सर्वसाधारण (स्त्री), आटपाडी – सर्वसाधारण, जत – सर्वसाधारण (स्त्री), वाळवा – सर्वसाधारण, पलूस – नागरिकांचा मागास प्रवर्ग, तासगाव – सर्वसाधारण (स्त्री), कडेगाव – सर्वसाधारण, शिराळा – नागरिकांचा मागास प्रवर्ग.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰