yuva MAharashtra हर घर तिरंगा अभियानात सहभागाचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हर घर तिरंगा अभियानात सहभागाचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन



               

        सांगलीदि. 13, (जि. मा. का.) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन 2022 पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे, भारतीय राष्ट्र ध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे ही या उपक्रमाची मूळ कल्पना आहे. याकरिता 15 ऑगस्टपर्यंत राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

            हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानाचा केंद्रबिंदू असलेला उपक्रम म्हणजे हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय / निमशासकीय सहकारी / खाजगी आस्थापना कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा. जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालय / महत्वाची स्थळे / पाणीसाठा आणि वारसा स्थळे याठिकाणी तिरंगा रोषणाई करण्यात यावी. सर्व शासकीय संकेतस्थळावर हर घर तिरंगा विषयक मजकूर आणि संबंधित लोगो असावेत.

 

यावर्षी 'हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग या घोषवाक्यासह हर घर तिरंगा अभियान साजरे करावयाचे आहे. त्यामुळे या संदर्भाने स्वच्छ पाणी व परिसर स्वच्छता या मोहिमा हाती घेणे आवश्यक आहे. या उपक्रमाचे महत्व लक्षात घेता प्रत्येक शाळेमध्ये आणि महावि‌द्यालयामध्ये अनुषंगिक उपक्रम राबविण्यात यावेत. 15 ऑगस्ट रोजी अमृत सरोवर आणि सार्वजनिक स्थळे अशा ठिकाणी राष्ट्रध्वज फडकाविण्यात यावा. नागरिकांनी तिरंगासह आपल्या सेल्फी संकेतस्थळावर अपलोड कराव्यात व त्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करण्यात यावे.

 

            स्वयंसेवक नोंदणीसाठी, अधिक माहितीसाठी, सेल्फी अपलोड करण्यासाठी व तपशीलवार माहितीसाठी https://harghartiranga.com  या संकेतस्थळावर सेल्फी, फोटो व तपशीलवार माहिती अपलोड करण्यात यावी.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰