yuva MAharashtra सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे नामांतर "ईश्वरपूर" करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार - संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे नामांतर "ईश्वरपूर" करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार - संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील



मुंबईदि. १८ : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर(ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून "ईश्वरपूर" करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. जनभावना लक्षात घेता इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव "ईश्वरपूर" असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहेअसे निवेदन संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केले.

श्री. पाटील यांनी निवेदनात म्हटले कीगाव किंवा शहर यांचे नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असूनयाप्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करण्यात येत आहे. केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर "ईश्वरपूर" असे करण्यात येईल.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

◾ YouTube Channel

   🌐  https://youtube.com/@thejanshakatinews5707

◾ News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰