पलूस दि. 12 : पलूस तालुक्यात दिनांक 10/07/ 2025 रोजी इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी साठी व दिनांक 11/7/ 2025 रोजी इयत्ता तिसरी इयत्ता चौथी वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळा स्वामी रामानंद विद्यालय रामानंदनगर येथे संपन्न झाली.
गटविकास अधिकारी राजेश कदम व गटशिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता शोध चाचणी संदर्भात शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांची कार्यशाळेचे आयोजन स्वामी रामानंद विद्यालय रामनगर येथे करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी इयत्ता पहिली व दुसरी मधील 78 शिक्षक व तिसरी व चौथीसाठी 75 शिक्षक उपस्थित होते.
कार्यशाळेसाठी पलूस पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार व शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे सन 2024 -25 मध्ये गुणवत्ता शोध परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सन 2025 - 26 मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावेत प्रशासन आपल्या सोबत आहे. येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही आपली गुणवत्ता आपण सिद्ध करून दाखविली पाहिजे त्याशिवाय आपला पट वाढणार नाही आणि समाजाचा जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. त्यासाठी आपण सदैव तयार राहिले पाहिजे शासन तुमच्या नेहमी सोबत आहे.
या कार्यशाळासाठी मार्गदर्शक म्हणून रमेश हजारे यांनी चांगले मार्गदर्शन केले तसेच तालुक्यातील कौशल्य चंदनशिवे, वृषाली लाड, ज्ञानेश्वर रोकडे, रवींद्र माने, बिबीशन महानवर, सुस्मिता थोरात,मुळीक व भाग्यश्री चौगुले यांनीही मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेसाठी सर्व केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक केंद्रप्रमुख किरण आमने, आबासाहेब डोंबाळे, किशोर भंडारे उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन अरुण कोळी धनंजय भोळे जयकर कुटे सुवर्णा रनवरे वर्षाराणी पुदाले,शमीम नदाफ यांनी केले होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰