सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोमवार, दिनांक 16 जून 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 16 जून रोजी दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह जत येथे राखीव. दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह जत येथे पत्रकार परिषद. दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सातारा विजापूर महामार्ग, जत येथे रस्ता व सभागृहाचे उद्घाटन व जाहीर सभा. सायंकाळी 6 वाजता मिरज तालुक्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीचे उद्घाटन व जाहीर सभा. रात्री 8 वाजता पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट व पाहणी. रात्री 10.40 वाजता किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰