< व्हिडीओ पहा >
किर्लोस्करवाडी दि. 25 : किर्लोस्करवाडी येथे रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी पूल यांची कामे सुरू आहेत ही कामे चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदनाद्वारे केला आहे. याकरिता अख्तर पिरजादे हे किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर दिनांक 26 जून रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आणि तीन जुलै पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत.
हे दोन्ही पूल वाहतुकीकरिता धोकादायक आहेत. अपघाताला निमंत्रण देणारे आहेत. या पुलामुळे अनेक अपघात होऊन नागरिकांचे प्राण जाणार आहेत.अशी भीती अख्तर पिरजादे यांनी वर्तवली आहे.याची खातरजमा व्हावी म्हणून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी किर्लोस्करवाडी उड्डाणपूल, भुयारी पूल या ठिकाणी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी
तहसीलदार दिप्ती रिठे,मंडल अधिकारी कोळी रेल्वे एमआरआयडीसीचे अधिकारी साईप्रताप आणि इतर अधिकारी तसेच पीडब्ल्यूडी चे अभियंता एम एस पाटील यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी आंदोलन कर्ते अख्तर पिरजादे यांच्या अडचणी विचारात घेतल्या, त्या दृष्टीने त्यांनी तेथील सर्व ठिकाणाची पाहणी केली. कामगार भवन ते किर्लोस्कर वाडी रेल्वे स्थानकापर्यंत चा रस्ता साडे सात मीटर व्हावा या रुंदी करणाबाबत सूचना दिल्या.
प्रांत साहेबांचा भुयारी पूल, उड्डाणपूल आणि इतर कामाच्या पाहणीचा अहवाल वरिष्ठ यांना सादर करण्यात येणार आहे. या उड्डाण पूल मार्गे ऊस वाहतूक होणार नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहना सोबत सर्व वाहनांना या उड्डाणपुलाचा त्रास होणार आहे. बैलगाडीवरून ऊस वाहतूक तर होणारच नाही. यासह रेल्वे संबधी 22 मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे हे आंदोलन करत आहेत त्यांनी यासंबंधीची निवेदने पंतप्रधान, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, पालकमंत्री, आमदार,खासदार लोकप्रतिनिधी यांच्या सह संबंधित विभागांना पाठवले आहे.
हेही पहा ----
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰