yuva MAharashtra बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न



 

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : बोगस वैद्यकीय व्यावयासिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, पोलीस उपाधिक्षक तथा समितीचे सदस्य सचिव दादासाहेब चुडाप्पा, अशासकीय सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सुरेश भोसले यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व अन्य शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते.






जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यात कार्यरत बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. बोगस वैद्यकीय व्यावयासिकांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करावी. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा नियमितपणे आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांबाबत जनतेमध्ये जनजागृती करावी, वैद्यकीय उपचाराबाबतचे आक्षेपार्ह जाहिरातींचा आढावा घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करावी. बोगस व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय परिषदेने घेतलेल्या क्यू आर कोडबाबत मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक व जनतेमध्ये जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

बोगस डॉक्टर यांची माहिती मिळविण्यासाठी मान्यताप्राप्त डॉक्टर यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरी भागात जनजागृती फलक, ग्रामीण भागात ग्राम पंचायत स्तरावर विविध माध्यमातून जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिल्या.

प्रारंभी दादासाहेब चुडाप्पा यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰