भिलवडी : माळवाडी ( ता.पलूस ) ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती सुरैया झैरुद्दीन तांबोळी यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी शुक्रवार दि. १६ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवड प्रक्रिया पार पडली.
या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सुरेखा जाधव यांनी काम पाहिले व त्यांना तलाठी दिपा मोहटकर व ग्रामविकास अधिकारी एच.ए. कांबळे यांनी सहकार्य केले.
ग्रामविकास अधिकारी व सद्श्य यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार दि. १६ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सौ .अश्विनी अमोल साळुंखे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माळवाडी गावचा सर्वांगीण विकासाचा मानस नवनिर्वाचित सरपंच सौ .अश्विनी अमोल साळुंखे यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केला.
सौ .अश्विनी अमोल साळुंखे ह्या बाळू कृष्णा ( शाहीर ) गायकवाड यांच्या त्या नातसून असून अंकलखोप जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री अमोल विलास साळुंखे यांच्या त्या पत्नी आहेत.
सरपंच पदाच्या निवडीसाठी सौ .अश्विनी अमोल साळुंखे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सुरेखा जाधव यांनी जाहीर केले.
यावेळी उपसरपंच सुनिल खोत , सदस्य संजय काटकर , संपत सोनवले , शिवाजी गायकवाड , हनमंत नलवडे , भाग्यश्री वायदंडे , अर्चना तावरे , स्वप्नाली मोरे , अश्विनी वाघमारे यांच्यासह आदी सदस्य् उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच अश्विनी साळुंखे यांच्या समर्थकांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण करत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली.
यावेळी काँग्रेसचे नेते व पॅनेल प्रमुख संताजी जाधव , माजी सरपंच विनायक भोळे , माजी सरपंच जनार्दन साळुंखे , माजी सरपंच अच्युतराव पाटील , स्वप्नील तावदर , यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमचे नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांच्या सह गावातील सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी उपसरपंच व सर्व सद्श्य या सर्वांना बरोबर घेऊन माळवाडी गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच सौ .अश्विनी साळुंखे यांनी द. जनशक्ती न्यूज शी बोलताना व्यक्त केला.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰