yuva MAharashtra स्मारकांची अपूर्ण कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

स्मारकांची अपूर्ण कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



        सांगलीदि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या विविध स्मारकांची कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

            जिल्ह्यातील विविध स्मारकांच्या आराखड्याची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 80 ते 90 टक्के काम पूर्ण असलेल्या स्मारकांचे काम तात्काळ पूर्ण करुन त्यांचे लोकार्पण करण्यात यावे. इतर स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक मंजूरी व निधीसाठी पाठपुरावा करून त्यांचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रांती अग्रणी जी.डी बापू लाड यांचे कुंडल येथील स्मारक, स्वर्गीय आर आर पाटील यांचे सांगली येथील स्मारक, हिंदकेसरी मारुती माने यांचे कवठेपिरा येथील स्मारक, नटसम्राट बालगंधर्व यांचे मौजे नागठाणे येथील स्मारक, अंकलखोप येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम, शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकास आराखडा, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे शिराळा येथील स्मारक, आटपाडी येथील कै. ग. दि. मा नाट्यगृह इमारतीचे बांधकाम, स्वर्गीय पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथण्णा नायकवडी यांचे वाळवा येथील स्मारक, स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडूरंग गोविंद पाटील यांचे मौजे येडेनिपाणी येथील स्मारक, मौजे बलवडी येथील क्रांती स्मृतीवन इत्यादी कामांचा आढावा घेतला.

            यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर स्मारक व अन्य कामांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर सादरीकरण केले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰