yuva MAharashtra राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यात 1317 प्रकरणे निकाली 14 कोटी 22 लाखाहून अधिक रक्कम वसूल

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यात 1317 प्रकरणे निकाली 14 कोटी 22 लाखाहून अधिक रक्कम वसूल



 

        सांगलीदि. 11, (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतचे दि. 10 मे 2025 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 503 दावापूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली, जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील मिळून 814 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 1 हजार 317 प्रकरणे निकाली करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातून एकूण 14 कोटी 22 लाख 74 हजार 896 रूपये इतक्या रक्कमेची वसूली करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

 

            लोकअदालत दिवशी जिल्हा न्यायाधीश क्र. 1 श्री. व्ही. डी. निंबाळकर यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेवून आपला मोलाचा वेळ व पैसा वाचविण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश क्र. 4 श्री. डी. वाय. गौड व जिल्हा न्यायाधीश क्र. 5 श्रीमती. जे. ए. मोहंती, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. अशोक वाघमोडे व वकिल संघटनेचे सदस्य उपस्थित होते. 


       मोटार अपघात वाहन दावे प्रकरणातील मयत संदीप हिंगमिरे यांची पत्नी स्नेहल हिंगमिरे व इतर नातेवाईक यांना 75 लाख रूपये रक्कम बजाज अलायन्स जनरल इन्शुरंन्श कंपनी यांच्याकडून लोकअदालतमध्ये देण्याबाबत आदेश करण्यात आले. विमा कंपनीतर्फे विधी अधिकारी कौस्तुभ सहस्त्रबुध्दे हे उपस्थित होते व ॲड. सचिन फाटक यांनी काम पाहिले. अर्जदार तर्फे अॅड. रामचंद्र आवटे यांनी काम पाहिले. अर्जदार व विमा कंपनीतर्फे काम पाहिलेले विधिज्ञ यांचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी अभिनंदन केले. 




            कौटुंबिक न्यायालय सांगली येथे गेली 5 वर्षे प्रलंबित असलेले वैवाहिक वाद प्रकरण या लोकदालतमध्ये औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश डी. एम. पाटील यांनी तडजोडीने मिटविले व मुलीस सुखाने नांदावयास पाठविले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी दोघांना पुष्पगुच्छ देवून भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश क्र. 1 श्री. व्ही. डी. निंबाळकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे उपस्थित होते. 

            या लोकअदालतमध्ये सांगली मुख्यालय येथे पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश क्र. 4 श्री. डी. वाय. गौड व जिल्हा न्यायाधीश क्र. 5 श्रीमती. जे. ए. मोहंती यांनी जिल्हा न्यायाधीश पॅनेलप्रमुख म्हणून तर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. बी. शेंडगे, श्रीमती. एन. के. पाटील, एस. बी. माने, एस. पी. राचकर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती आर. एस. पाटील, एस. बी. बहिरट, श्रीमती. एस. एस. जाधव, जे. एस. मकानदार, ओ. एस. शास्त्री, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. एम. पाटीलसदस्य औद्योगिक न्यायालय सांगली. एस. ए. उपाध्ये, निवृत्त न्यायाधीश सांगली यांनी काम पाहिले. तसेच कन्सिलिएटर म्हणून अॅड. फारूक कोतवाल, अॅड. जे. व्ही. नवले, ॲड. श्रीमती मुक्ता दुबे, अॅड. मोहन कुलकर्णी, ॲड. विक्रम पाटील, अॅड. चिराग सोनेचा, ॲड. अमित पाटील, अॅड स्वाती गौड, अॅड. अमोल डोंबे, अॅड. सचिन गायकवाड, अॅड. प्रशांत सोमण, डॉ. पूजा नरवाडकर सामाजिक कार्यकर्ते यांनी काम पाहिले. 

        ही लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गिरीजेश ग. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक शंकरराव वानखेडे, वरीष्ठ लिपिक संतोष खांदारे, कनिष्ठ लिपिक नितिन आंबेकर, विजय माळी, गौस नदाफ यांनी संपूर्ण लोकअदालतीचे नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडले. या लोकअदालतच्यावेळी पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. 

            पुढील राष्ट्रीय लोकअदालत दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार असून पक्षकारांनी यामध्ये सहभाग घेवून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली तर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे. 


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰