सांगोला दि २७ : समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेचे उपाध्यक्ष पै.इंद्रजित पवार यांना पाचुंब्री ता. शिराळा येथील कुस्तीमैदानात 'सर्वोत्कृष्ठ कुस्ती कार्यवाहक' पुरस्कार व सन्मानपत्र व चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
यामध्ये इंद्रजित पवार यांना दिलेल्या सन्मानपत्रात इंद्रजीत पवार यांनी कुस्ती सारख्या मर्दानी खेळाला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामुळेच महाराष्ट्रातील गावोगावी पैलवानकीच्या शड्डूचा आवाज सर्वत्र घुमतं आहे.
गावागावात तालमींची सोय होवून सशक्त निरोगी, निस्वार्थपणे आपला स्वाभीमान जोपसण्याचा प्रयत्न करणारी पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून.आपण आपल्या माध्यमातून तांबड्या मातीचा गौरवशाली इतिहास समाजापुढे सातत्याने विविध माध्यमातून मांडत असल्यानेच या कुस्ती क्षेत्रात आपले आयुष्य वेचणाऱ्या व आपले नशिब आजमावणाऱ्या जुन्या व नविन पिढीला प्रेरणा व उजाळा दिला.आपण फळाची अपेक्षा न करता कुस्ती क्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कार्याची दखल घेवून सन्मान लाल मातीचा. सन्मान कार्यकर्तुत्वाचा.म्हणून पाचुंब्री येथील श्री जोतिर्लिंग देवाच्या यात्रे निमित्त आयोजित कुस्ती मैदानात उत्कृष्ट कुस्ती कार्यवाहक पुरस्कार आम्ही आपणास बहाल करीत आहोत. या पुढे ही सेवा अखंडीत सुरू राहून नविन पिढीसाठी या लाल मातीच्या सन्मानाचा इतिहास आदर्श ठरावा. असे गौरवोद्दगार काढले.
यासाठी समर्थ संस्था व न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रा.ली.यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे,सचिव महेशकुमार दत्तू,मेघश्याम सुरवसे, इकबाल पाटील, शरदचंद्र पवार, लता पाटील न्यूट्रीस्टार समूहाचे प्रमुख प्रदीप कुंभार,प्रल्हाद पाटील, जोतिराम सुतार,संदीप कुंभार,देवदास जाधव,भारत वरुटे,कृष्णात डवंग,उत्तम पाटील,विनायक गुरव,संजय गुरव यांचेसह संस्थेचे सभासद व हितचिंतकांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰