पलूस : पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील तिरुपती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 2025 ते 2030 पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी सतीश मिठारी, आणि व्हाईस चेअरमनपदी अख्तर पिरजादे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहाय्यक निबंध कार्यालय पलूस येथील अधिकारी सचीन पाटणकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिये वेळी चेअरमन पदाकरिता सतीश मिठारी आणि व्हाईस चेअरमन पदाकरिता अख्तर पिरजादे यांची नावे आल्याने त्यांची चेअरमन, व्हाईस चेअरमन म्हणून निवड बिनविरोध झाली आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटणकर यांनी घोषित केले .
यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीनंतर सतीश मिठारी आणि अख्तर पिरजादे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक,माजी सभापती दीपक मोहिते व निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार.....
यावेळी पाटणकर साहेबांचा सत्कार देखील संस्थेचे संस्थापक माजी सभापती दीपक मोहिते यांनी केला. यावेळी बोलताना दीपक मोहिते म्हणाले,अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या संस्थेची स्थापना झाली परंतु गेली 25 वर्षापासून ही संस्था चांगल्या पद्धतीचे काम करत आहे. चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी संस्था वाढीकरिता प्रयत्न करावेत. यावेळी व्हाईस चेअरमन अख्तर पिरजादे म्हणाले की, संस्थापक दीपक मोहिते यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला चेअरमन आणि व्हाईस चेअरमन अशी पदे बहाल केली.त्यांच्या विश्वासास पात्र ठरून संस्थेच्या उन्नती करिता आम्ही प्रयत्न करू असे अभिवचन दिले.
व्हा. चेअरमन अख्तर पिरजादे यांचं मनोगत -----
यावेळी संस्थेचे संचालक
रोहन दीपक मोहिते, सिद्धेश्वर कोंडीबा कुंभार, जावेद बरकतअली पठाण, संदीप महादेव कुंभार,सुदाम महादेव फाटक, वैशाली दीपक मोहिते, ऋतिका रोहन मोहिते, सचिव चंद्रकांत नेर्लेकर, गजेंद्र कुंभार,संतोष फडणीस, विजया मुळीक आदि उपस्थित होते. शेवटी आभार गजेंद्र कुंभार यांनी मानले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰