yuva MAharashtra आर्थिक स्वराज्य निर्माण करणे हीच न्यूट्रीस्टार ची आशा : प्रदीप कुंभार ; समर्थ संस्थेची कोल्हापूर येथे कार्यशाळा संपन्न

आर्थिक स्वराज्य निर्माण करणे हीच न्यूट्रीस्टार ची आशा : प्रदीप कुंभार ; समर्थ संस्थेची कोल्हापूर येथे कार्यशाळा संपन्न

समर्थ संस्थेची कोल्हापूर येथे कार्यशाळा संपन्न...




      समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था,न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड व समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्यसनमुक्त व रोगमुक्त भारत अभियानांतर्गत कोल्हापूर येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी न्यूट्रीस्टार हेल्थ प्रो.प्रा.लिमिटेड चेअरमन प्रदीप कुंभार यांनी संस्थेची व कंपनीची पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. 




व्यसनमुक्ती व निरोगी भारत अभियानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना सुदृढ व निरोगी आरोग्य देणार. त्याचबरोबर एक नवीन क्रांती घडविणार ज्याप्रमाणे चारशे वर्षांपूर्वी छ. शिवाजी महाराजांनी बलाढ्य आशा मुघलांच्या सत्तेला त्यांच्या  जुलमी अत्याचाराच्या विरुद्ध निवडक मावळ्यांच्या साहाय्याने आव्हान देऊन,शक्तीपेक्षा युक्तीच्या साहाय्याने उध्वस्त केले.


त्याचप्रमाणे आपल्या देशातील बेरोजगार व गरिबी रुपी मुघली सत्ता उलटवून टाकण्यासाठी न्यूट्रीस्टार च्या माध्यमातून एकजीव व प्रामाणिक मावळ्यांना सोबत घेऊन नवीन मोहीम हाती घेतली आहे.बेरोजगार व गरिबीरूपी मुगली सत्तेला गाडून आर्थिक स्वराज्य निर्माण करून इतिहासाची पुनरावृत्तीकरण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला.



               या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व गायक प्रल्हाद पाटील व आभार न्यूट्रीस्टार कंपनीचे मार्केटिंग प्रमुख ज्योतीराम सुतार यांनी मानले.यावेळी समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे,न्यूट्रीस्टार कंपनीचे प्रमुख सहकारी संदीप कुंभार,देवदास जाधव,भारत वरुटे,कृष्णात डवंग,उत्तम पाटील,विनायक गुरव,संजय गुरव यांचे सह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰