इंद्रजीत घुले :मराठी साहित्य विश्वातील अष्टपैलू हिरा
( आत्मप्रौढी न गाजवणारे संयमी आदर्श व्यक्तिमत्व)
मंगळवेढा ही ऐतिहासिक राजे,राजवाडे,धन-धान्यच्या बाबतीत संपन्न भूमी बरोबर संत,साहित्य,धर्म,दातृत्व,कर्तृत्व व नेतृत्वा चा वारसा लाभलेली जगातील अद्वितीय नगरी आहे. या भूमीने देशाला अनेक महान व्यक्तिमत्वाचा वारसा दिला.याच भूमीत इंद्रजित घुले नामक रत्न उदयास येऊन अवघ्या मराठी साहित्य विश्वाला व्यापणारा कोहिनूर हिरा बनले आहे. २२ फेब्रुवारी रोजी सामाजिक परिवर्तनाची नांदी म्हटलेल्या ऐतिहासिक करवीर नगरीत जन्माला येऊन मंगळवेढा येथे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूलमध्ये घेत,श्री संत दामाजी महाविद्यालयात पदवीधर होऊन,पुणे विद्यापीठातून एम.ए. (मराठी)चे शिक्षण पूर्ण केले.त्यासोबत पश्चिम विभागीय भाषा संशोधन केंद्रात,सांस्कृतिक भूमी पुणे मध्ये कोकणी भाषेचे प्रशिक्षण घेतले.मराठी भाषेइतकेच कोकणी भाषेवर प्रभुत्व संपादन करून कोकणी साहित्यावर आपला प्रभाव निर्माण केला.
सर्वसामान्य कुटुंबांना भोगाव्या लागणाऱ्या अनेक समस्या व अडचणींना तोंड देत बालपण गेले.कमी वयात कौटुंबिक जबाबदारीचे ओझं खांद्यावर आल्यामुळे सामाजिक वातावरण,नाते-संबंध,जग रहाटी यांचे ज्ञान झाले.या प्रतिकूल परिस्थितीत व संघर्षात त्यांना वास्तविक जीवनाचे ज्ञान झाले.इयत्ता सातवी पासूनच वडिलांनी वाचनाची सवय लावून आवड निर्माण केली.त्यावेळी अनेक प्रसिद्ध साहित्यिक ग्रंथ,कथा, कविता,चरित्र यांचे वाचन करीत साहित्य निर्मितीची बीजे रोवली गेली.साहित्य वाचनाबरोबर प्रसंगी करावी लागलेली कामे व त्याचा अनुभव यांचा त्यांच्या संवेदनशील मनावर परिणाम होऊन लहान वयातच साहित्य निर्मितीचा प्रयत्न केला.इयत्ता नववीत असताना लिहिलेल्या चारोळीचे दै.संचार मध्ये प्रसिद्ध होऊन मिळालेला दुसरा क्रमांक हा यशस्वी काव्य लेखनाचे प्रेरणास्थान बनले. कॉलेजपर्यंत त्यांनी अनेक कविता व चारोळ्या ची निर्मिती केली.'लग्नातल जेवन' ही कविता त्यांच्या साहित्य निर्मितीत मैलाचा दगड ठरली. महाविद्यालयीन युवक,युवती सह समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या बरोबर अवघ्या साहित्य विश्वाने या कवितेला डोक्यावर घेतले.आई,वडील,बहिण,भाऊ यांच्यासह कौटुंबिक जीवन जगत असताना प्रतिकुल परिस्थितीमुळे अनेक कौटुंबिक,सामाजिक धक्क्यांना तोंड द्यावे लागले. कठीण कौटुंबिक परिस्थितीशी झुंजत असताना,कुटुंबातील माता - पित्याचे आजारपण पाठीवरती घेत श्रावण बाळाची भूमिका ही त्यांनी प्रामाणिकपणे निभावली.या सर्वांचे बरे-वाईट अनुभव संवेदनशील व भावनिक मनाने टिपत समाजाच्या प्रवृत्तीचे निरीक्षण करत अनुभव विश्व विस्तारत गेले. या आलेल्या अनुभवानी वास्तववादी साहित्य निर्मितीस सुरुवात झाली.
'या वेशीपासून त्यावेशी पर्यंत', 'इरसाल झटका','माझा दोस्त' व 'मंगळवेढे भूमी संताची'
या प्रकाशित साहित्यावर पुरस्कारांची खैरात झाली.लेखनाबरोबर काव्यवचन व सादरीकरण याच्या कौशल्यामुळे राज्यसह,देशभर अनेक छोट्या मोठ्या कवीसंमेलनामध्ये व साहित्य संमेलनात काव्यवाचन,सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली व त्यात प्रेक्षकांचा त्यांना उदंड प्रतिसाद लाभला. मंगळवेढ्यात सुरू केलेला प्रवास राज्यसह देशभर कधी पोहोचला ते समजलच नाही.सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर चाहतावर्ग निर्माण झाला.सादरीकरणाबरोबर कार्यक्रमाचे उत्कृष्ट 'सूत्रसंचालन' करून साहित्य रसिकांना खिळऊन त्यांचे ठेवण्याचे कौशल्य अप्रतिम आहे.
त्यातून त्यांना सोलापूर,पुणे,संभाजीनगर आकाशवाणी वरती मुलाखत व काव्य सादरीकरण करता आले. दूरदर्शन,अनेक टीव्ही चॅनेल व प्रसिद्ध न्यूज चैनल यांनी मुलाखतीसह काव्य प्रदर्शन केले.कमी शब्दात मोठा आशय मांडण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही.मराठी बरोबरच त्यांना अवगत असणाऱ्या कोकणी भाषेत साहित्य निर्मिती केली.कोकणी साहित्य रसिकांचे प्रेम त्यांच्या वाट्याला आले.गोव्याच्या कोकणी भाषेत जाग,बिंब,कोकणी टाइम्स, पणजी येथील दै.सूनापरान्त, दै. भांगरभुंय मधून कोकणी साहित्य प्रकाशित करून आपली कोकणी साहित्यावर छाप पडली.
परिस्थितीशी झुंजत असताना प्रसंगानुसार अनेक ठिकाणी काम,नोकरी करावी लागली परंतु कोणत्याही कामात त्यांचे मन रमण्यामुळे आपल्या आवडीच्या साहित्य क्षेत्रालाच व्यवसाय म्हणून निवड केली.यातूनच 'शब्दशिवार प्रकाशन ' या प्रकाशन संस्थेची निर्मिती करून अनेक नामवंत लेखक,कवीची पुस्तके,कवितासंग्रह,कथा संग्रह,शाळा महाविद्यालया बरोबर विविध संस्थांचे वार्षिकांक प्रकाशित केले. अत्यंत उत्कृष्ट अशा दीडशे पेक्षा जास्त साहित्य ग्रंथाचे प्रकाशन करून मराठी साहित्य विश्व समृद्ध व संपन्न केले.याशिवाय 'शब्दशिवार' या दिवाळी अंकांनी मरगळलेल्या साहित्य विश्वाला संजीवनी देत या अंकांने सलग सहा वर्ष वेगवेगळ्या संस्थांचा 'उत्कृष्ट दिवाळी अंक' हा पुरस्कार मिळवत नवीन कीर्तिमान प्रस्थापित केला.
जन्मस्थान शाहूनगरीच्या संस्काराचा वसा जपत त्यांनी त्यांच्या जीवनात डॉ.आ.ह.साळुंखे यांना प्रेरणास्थान व आदर्श मानले. त्यांच्या विचारग्रंथासोबत त्यांनी तात्यांच्या जीवनप्रावासावर आधारित अनेक नामवंताना सोबत घेत दोन दिवस 'आ.ह. विचार वारी' या अगळ्या वेगळ्या उपक्रमाचे यशस्वी नियोजन करून, आयोजनाचा उत्कृष्ठ नमुना दाखवून दिला.सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असणारा स्नेह,तसेच प्रसिद्ध साहित्यिक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, डॉ. राजेंद्र दास, महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, श्रीधर अंभोरे सहसंपादक प्राजक्ता हनमघर यांच्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व सोबत असल्यामुळेच माता पित्याचे छत्र हरवले असतानाही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शब्दाच्या श्रीमंतीने परिस्थितीच्या गरीबीवर मात करत आपले जीवन यशस्वीपणे जगत आहोत.
अशाप्रकारे लेखक,कवी,प्रकाशक,संपादक सूत्रसंचालन,निवेदक,वक्ता,संयोजक इत्यादी क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे,बहुआयामी,चतुरस्र व्यक्तिमत्त्व मराठी साहित्यविश्वतील अष्टपैलू हिरा बनून मंगळवेढ्याचा सन्मान बनले आहेत.असे असूनही कोणत्याही प्रकारचा आत्मस्तुती,आत्मप्रौढी,गर्व न बाळगता प्रेमळ,मनमिळावू,शांत स्वभावाने सर्वांना आपलंसं करून मंगळवेढ्याचे नाव देशाबरोबर विश्वामध्ये सन्मानाने पोहोचवणारे एक संयमी व स्वाभिमानी,चारित्र्यशील,आदर्श व्यक्तिमत्व इंद्रजित घुले यांना वाढदिवसानिमित्त अभिनंदन करून त्याच्या पुढील सुवर्णमय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
अध्यक्ष
समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था वाटंबरे ता. सांगोला
90 49 106 853
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰