VIDEO
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇https://youtu.be/Dnlt1U3FbPg?si=dvYqOR7k6bMqyb-v
भिलवडी दि. २३ : श्री. बिरेश्वर को-ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक्संबा...भिलवडी शाखेचा प्रथम वर्धापनदिन शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राजेंद्र भरमाप्पा हजारे यांच्या शुभहस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन श्रीफळ वाढविण्यात आला.
यावेळी भिलवडीच्या प्रथम नागरिक सिमा शेटे , कपिल शेटे , अमोल किणीकर , विष्णू चौगुले , शरद गुरव , अशोक चौगुले , कुमार चौगुले , शिवाजी पाटील , अनिल विभुते , सुरेश चौगुले , संजय जोशी , सतीश चौगुले , शितल बिरनाळे , सुनील चौगुले , किरण गुरव , धोंडीराम मोकाशी , हनुमंत डिसले , नवनाथ वसगडे , महेश शेटे , दत्तात्रय कदम , तुषार पाटील यांच्यासह संस्थेचे शाखाधिकारी विनय सदलगे , कर्मचारी श्रीधर कोडोले , प्रणिता उंडे , अभिषेक भोसले व इतर हितचिंतक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिलवडी येथील श्री. बिरेवेश्वर को-ऑफ क्रेडिट सोसायटी ही शाखा आज दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असून परिसरातील नागरिकांनी या संस्थेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कोट्यवधी ठेवी ठेवल्या आहेत. अशी माहिती संस्थेचे शाखाधिकारी विनय सदलगे यांनी दिली.
भिलवडी व परीसरात या संस्थेची वाटचाल पहाता पहाता एक वर्षांची झाली आहे.
पतसंस्था जगतात श्री. बिरेश्वर को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या भिलवडी शाखेचे नाव सर्वमान्य झाले आहे.
पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने यावेळी बोलताना भिलवडी शाखेचे शाखाधिकारी विनय सदलगे यांनी सर्व सल्लागार समिती सदस्य, प्रशासन वर्ग, सभासद, कर्जदार, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांचे व सर्व उपस्थित मान्यवरांचे कृतज्ञतापूर्वक धन्यवाद मानले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰