yuva MAharashtra एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामिण : अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामिण : अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत



 

        सांगलीदि. 5 (जि. मा. का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामिण अंतर्गत विविध महसुली गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची 28 मानधनी रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 अखेर शासकीय सुट्टी वगळून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामिण कार्यालयात सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत साक्षांकित प्रतीसह समक्ष पोहोच करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीअसे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामिण चे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता या बाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायतपंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध आहे.

       

अटी व शर्ती - उमेदवाराचे वय दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी वय वर्षे 18 वर्षांच्या वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवासी असावी. उमेदवाराने फक्त स्थानिक गावातीलच अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील.

            गावनिहाय अंगणवाडी सेविका रिक्त पद असलेल्या अंगणवाडीचे ठिकाण,केंद्र क्रमांक व रिक्त पद संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे. काकडवाडी – काकडवाडी 106- 01, बिसूर – बिसूर 96 - 01


            गावनिहाय अंगणवाडी मदतनीस रिक्त पद असलेल्या अंगणवाडीचे ठिकाण,केंद्र क्रमांक व रिक्त पद संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे. माधवनगर - माधवनगर 119 व 120 - 02, हरिपूर - हरिपूर 137 - 01, बामणोली - बामणोली 95 - 01, मौजे ‍डिग्रज - मौजे डिग्रज 124 व 129- 02, कर्नाळ – कर्नाळ 144 - 01, नांद्रे - नांद्रे 154, 158 व 159 - 03. बुधगाव  - बुधगाव 43 व 184 - 02, बिसूर - बिसूर 101 - 01, क.डिग्रज - क.डिग्रज 02, 13 व 14 - 03, समडोळी - समडोळी 23 व 24 - 02, तुंग - तुंग 30 - 01, कवलापूर - कवलापूर 48 व 60 - 02, कांचनपूर - कांचनपूर 104 - 01, दुधगाव 73 व 74 -  02, कवठेपिरान - कवठेपिरान 86 - 01, सावळवाडी - सावळवाडी 89 - 01, माळवाडी 90 व 91 - 02.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰