अमरापूर येथे शरद आत्मनिर्भरच्या वतीने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
व्हिडीओ
कडेगाव : शरद फौंडेशन संचालित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस-कडेगाव व टेके आय क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे अमरापूर (ता. कडेगाव) येथे मोफत नेत्ररोग, शस्त्रक्रिया व औषधोपचार शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात अनेक गरजू रुग्णांना नेत्रचिकित्सा व उपचार मिळाले. यावेळी शरद आत्मनिर्भरच्या अध्यक्षा धनश्री शरद लाड यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली व त्यांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली.
नेत्र तपासणी आणि त्यानंतर हृदयरोग तपासणी व उपचार शिबीरांना गरजू रुग्णांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परिसरातील रुग्णांना या तपासण्या व उपचार घेण्यासाठी शहरात जावे लागते. त्यामुळे मोठा आर्थिक भार त्यांच्या कुटुंबावर पडतो. परंतु अशा आरोग्य शिबिरातून अनेकांचे उपचार मोफत झाल्याने सामान्य माणसांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. अशापद्धतीने गरीब-गरजू रूग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे, असे मत धनश्री लाड यांनी व्यक्त केले.
सदर नेत्र तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कडेगाव तालुका कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, पलूस तालुका कार्याध्यक्ष विनायक महाडीक, दिपक मदने, जगन्नाथ कोळी, बाळासो शिंगटे, जगदीश देशमुख, महादेव रुपनर, साजिद मुलाणी, समीर देशमुख, नितीन देशमुख, सागर मोरे, पूनम मोरे, शारदा पाटील, साधना महाडिक, जुबेदा मुलाणी, अंजना देशमुख, अविनाश महाडीक, किरण शिंदे, विश्वास पवार, अतुल नांगरे यांच्यासह शरद फौंडेशन तसेच वैद्यकीय विभागाचे सर्व कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰