yuva MAharashtra आरोग्य विषयक माहिती : गुडघेदुखीवर घरगुती उपाय

आरोग्य विषयक माहिती : गुडघेदुखीवर घरगुती उपाय

           

     गुडघेदुखीवर घरगुती उपाय

◆ पारिजातक तुम्हाला माहीत असेलच ज्याचे सफेद रंगाची फुले रात्री उमलतात आणि सकाळी गळून जातात. या झाडाची 6 ते 7 पाने वाटून बारीक करून पेस्ट तयार करा आणि एक ग्लास पाण्यात उकळवा. उकळून उकळून ते जेव्हा अर्धे राहील तेव्हा ते आगीवरून काढा आणि कोमट करून दररोज रिकाम्या पोटी प्यावे. असे केल्यामुळे तुम्हाला शरीरातील आणि गुडघ्यातील वेदने पासून आराम मिळेल. या औषधी सोबत इतर कोणतेही औषध घ्यायचे नाही आहे. हा एक सर्वात प्रभावी उपाय आहे.



◆ कणहेर चे पाने उकळून त्यांनी बारीक पेस्ट बनवा आणि तिळाच्या तेलात मिक्स करून गुडघ्यावर मालिश करा. असे केल्यामुळे तुम्हाला वेदने पासून सुटका मिळेल.

◆ जर तुमच्या गुडघ्यामध्ये वेदना होत असतील तर रोज रात्री 2 चमचे मेथी एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी रिकाम्या पोटी मेथी चावून खावी आणि मेथीचे पाणी प्यावे यामुळे तुम्हाला कधीच गुडघा दुखण्याचा त्रास होणार नाही.

◆ एक ग्लास दुधात 4-5 लसून टाकून चांगले उकळवा आणि कोमट झाल्यावर पिण्यामुळे गुदाघादुखी मध्ये आराम मिळतो.

◆ दररोज अर्धा कच्चा नारळ खाण्यामुळे म्हातारपणात सुध्दा कधी गुडघेदुखीचा त्रास होणार नाही.

◆ 5 अक्रोड रोज रिकाम्या पोटी खाण्यामुळे तुमच्या गुडघ्यात कधी त्रास जाणवणार नाही.

◆ रोज रात्री झोपण्या अगोदर एक ग्लास दुधात हळद मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला हाडे दुखण्याच्या त्रासातून मुक्ती मिळेल. एका डाळीच्या आकारा एवढा चुना (जो आपण पान खाताना खातो) दही किंवा पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला हाडे दुखण्याचा त्रास कधी होणार नाही. चुन्याचे पाणी कधीही सरळ बसून प्यावे यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. हे औषध फक्त 1 महिना पिण्यामुळे शरीरातील कोणत्याही हाडाचे दुखणे असेल तर आराम मिळेल.

◆ सकाळ आणि संध्याकाळी भद्र आसन करण्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

◆ हाडांच्या दुखण्या पासून वाचण्यासाठी आपल्या भोजना मध्ये 25% भाज्या आणि फळांचा समावेश करा. असे केल्यामुळे तुम्हाला कधीही हाडे दुखण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

◆ सफरचंद, मोसंबी, संत्रे, टरबूज, खरबूज, केळे आणि नारळ इत्यादी फळांचे सेवन दररोज कर
◆ दुध आणि दुधा पासून बनलेले पदार्थ भरपूर खावेत आणि कच्चे पनीर आपल्या भोजनात समाविष्ट करावे असे केल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी मध्ये आराम मिळेल.

◆ बाजरी, मका यांचे देखील सेवन करा. कारण यामध्ये ते सर्व पौष्टिक गोष्टी असतात जे हाडे आणि सांधेदुखी पासून मुक्ती देतात.

◆ जर थंडीमुळे तुमच्या घरातील वृद्ध लोकांचे गुडघे दुखत असतील तर राईच्या तेलात लसून आणि ओवा शिजवा आणि मंग हे तेल कोमट झाल्यावर गुडघ्यावर मालिश करा, यामुळे वेदना त्वरित कमी होईल.

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐   https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐   www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰