भिलवडी (ता. पलूस) : भारत सरकारच्या वतीने 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह मोहीम 'प्रशासन गाव की ओर' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमे अंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक सरकारी सेवा प्रदान करण्यासाठी सुशासन सप्ताह मोहीम 'प्रशासन गाव की ओर' पाळत आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून, सार्वजनिक सरकारी सेवा प्रदान करण्यासाठी पलूस तहसीलमार्फत आज सोमवार दि. 23 डिसेंबर रोजी भिलवडी ग्रामपंचायत व मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये भिलवडी मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांसाठी समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा मेळावा प्रांताधिकारी रणजित भोसले , पलूस तालुक्याचे न्यायदंडाधिकारी दीप्ती रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुरेखा जाधव - मंडळ अधिकारी , मनीषा पवार पुरवठा अधिकारी , माळी मॅडम संजय गांधी योजना यांच्यासह विविध विभागातील आदी अधिकारी , कर्मचारी , संबंधित गावातील सर्व तलाठी व राशन दुकानदार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता.
या मेळाव्यामध्ये अनुक्रमे पुरवठा शाखा , संजय गांधी निराधार योजना शाखा , गाव कामगार तलाठी विभाग व सेतू विभागाचा समावेश होता.
संबंधित विभागांनी निर्देशांद्वारे अनेक समस्यांचे जागेवरच निराकरण केले.
माननीय पंतप्रधानांच्या 'प्रशासन गाव की ओर' (प्रशासनाच्या दिशेने खेड्यांकडे) या संकल्पनेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या समाधान मेळाव्यात पारदर्शकता, आणि प्रतिसादात्मक प्रशासन यावर भर देण्यात आला आहे.
मेळाव्यामध्ये दाखल प्रकरणे व कार्यवाही करण्यात आलेली प्रकरणे पुढीलप्रमाणे
१) पुरवठा शाखा -- नाव कमी/वाढ -- दाखल १५० कार्यवाही १५०
२) सं. गां. नि. यो. शाखा -- DBT/KYC १५ , नवीन अर्ज १३
3) तलाठी -- ७/१२ वाटप -- अर्ज १२६ ,
वाटप १२६ ,
८अ वाटप -- अर्ज २९ , वाटप २९
फेरफार वाटप -- अर्ज ३७ , वाटप ३७
उत्पन्न अहवाल -- अर्ज ३४ , वाटप ३४
माळवाडी आदेश वाटप -- अर्ज ४४ , वाटप ४४
माळवाडी फेरफार वाटप -- अर्ज ३ , वाटप ३
४) सेतु -- उत्पन्न दाखले -- अर्ज ९ , वाटप ९
डोमासाईल -- अर्ज १ , वाटप १
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰