भिलवडी - पलूस - कडेगांव मतदारसंघातील ग्रामस्थांच्या सेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी मी पुन्हा सज्ज असल्याचा विश्वास आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी दिला.
वसगडे ता.पलूस येथे सहकाऱ्यांसह भेट देऊन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी युवकांनी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे जोरदार स्वागत केले. माता-भगिनींनी अत्यंत प्रेमाने औक्षण करून ‘विजयी भवं’ असा आशीर्वाद दिला.
डॉ.कदम म्हणाले,
ग्रामस्थांनी पलूस-कडेगाव मतदारसंघात मी केलेल्या विकासकामांबद्दल व्यक्त केलेल्या आनंददायी प्रतिक्रिया ऐकून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. आपल्या साथीने व अनमोल सहकार्यामुळे मागील पाच वर्षांत मतदारसंघात अनेक नवनवीन योजना यशस्वीरीत्या राबवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे शक्य झाले. आता पुन्हा या निवडणुकीच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक विकासाचा विचार पुढे न्यायचा आहे. आपल्या सर्वांची खंबीर साथ व पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.
येत्या २० नोव्हेंबरला नंबर १ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी. आपल्या पलूस-कडेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करून देशातील एक आदर्श व विकसित मतदारसंघ बनविण्यासाठी मी वचनबद्ध आहे.
यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰