yuva MAharashtra जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध यंत्रणांच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला आढावा

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध यंत्रणांच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला आढावा



 

  सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) सन 2024-25 अंतर्गत विविध यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी  घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसेजिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटीलसमाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे व्यासपीठावर उपस्थित होते.



            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 करिता प्रारूप आराखडादिनांक 22 जून 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामधील मुद्यांचा अनुपालन अहवालजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 मधील प्रशासकीय मान्यता व निधी मागणी प्रस्तावकामनिहाय दायित्व निधी मागणी प्रस्तावसन 2023-24 अखेर व सन 2024-25 मधील वितरीत निधी खर्च करण्याबाबत तसेच प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे आदि बाबींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ज्या यंत्रणांचे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव आले नाहीत, त्यांनी ते तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मंजूर निधी विहित वेळेत खर्च होण्याबाबतची दक्षता घ्यावीअशा सूचना दिल्या.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰