yuva MAharashtra बाईक रॅलीव्दारे सांगलीत मतदार जनजागृती

बाईक रॅलीव्दारे सांगलीत मतदार जनजागृती



 

        सांगलीदि. 13, (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हा स्वीप कक्षामार्फत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः सहभाग घेऊन इतरांना प्रोत्साहन दिले.



          नवमतदार, युवा मतदार यांच्यामध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा स्वीप कक्ष व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सांगली यांच्यामार्फत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या बाईक रॅलीमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदेउप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरेउत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटेजिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजेसहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील आदिंनी सहभाग घेतला.



         या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली. मतदानाचे महत्त्व व 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

         बाईक रॅली विश्रामबाग चौक माळी चित्रमंदिर – शंभर फुटी रस्ता - कोल्हापूर रोड मारुती मंदिर रोड मार्गे शिवाजी स्टेडियम येथे या रॅलीची सांगता झाली.

         बाईक रॅलीमध्ये पोलीस विभागाचे अधिकारीग्रामपंचायत अधिकारीमहापालिका अधिकारीकर्मचारी, पत्रकारएमएच 10 बाइकर्स असोसिएशनविविध कॉलेजचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन जिल्हा परिषद अभियान कक्षाचे ग्रामपंचायत अधिकारी आर. डी. शिंदे यांनी केले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰