yuva MAharashtra आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्या ; रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांची मागणी.

आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्या ; रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांची मागणी.




उमरगा | प्रतिनिधी | दि. 30 नोव्हेंबर 

माजी कृषी राज्यमंत्री शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी केले

महायुतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत गेल्या दहा वर्षांपासून महायुती मध्ये निष्ठेने काम करीत आहेत. महायुतीतील अनेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खा. धैर्यशील माने यांना १९ व २०१४ ला निवडणूक आणण्यासाठी आ. सदाभाऊ खोत यांच्या सिंहांचा वाटा आहे. तसेच नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिराळा व जत विधानसभा मतदारसंघातून आ. सत्यजित देशमुख व आ. गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यासाठी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे.
शेतकरी, शेतमजूर, कामगार नेते अशी त्यांची ओळख आहे. आमदार सदाभाऊ खोत महायुतीच्या सरकारचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याची विनंती केली आहे.


निश्चितपणे एका शेतकरी नेत्याला महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये मंत्रिपदावर बसवून महायुतीचे सर्व नेते शेतकरी शेतमजूर कामगार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतील अशी अपेक्षा रयत क्रांती पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी व्यक्त केले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰