कुंडल (ता. पलूस) दि. ११ : शासकीय चुकीच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखाने अडचणीत आले असून खाजगी कारखाण्यांना वेगळा न्याय देवून सहकारी साखर कारखाने अडचणीत आणण्याचे काम शासन करत आहे या परीस्थिती ही यंदाच्या हंगामात १३ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे मत क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापु लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केले.
क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापु लाड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४/२५च्या २३ व्या गळीत हंगाम प्रसंगी ते बोलत होते यावेळी कारखान्याचे संचालक आमदार अरुण लाड, उपाध्यक्ष दिगंबर पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे प्रमुख उपस्थित होते
शरद लाड पुढे म्हणाले की आज बाजारात मंदीचे सावट आहे शासनाने मागील वर्षी ७ डिसेंबर रोजी इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले परंतु आज कोणताही व्यापारी सहकारी साखर कारखान्याची साखर खरेदी करायला तयार नाही असे असताना ही बाजारात साखर येते कुठुन हा प्रश्न गंभीर आहे.
इथेनॉल बंदी मुळे आधीच साखर उद्योगाला तोटा झाला त्यातच सहकारी साखर कारखान्यांना एक न्याय व खाजगी कारखाण्यांना एक न्याय यामुळे सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा डाव शासन करत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे इथेनॉल साठी स्थिर धोरण राबवले पाहिजे साखरेचे एम एस पी ४२०० रु पर क्विंटल दर केला पाहिजे व इथेनॉल चे ही दर त्या प्रमाणात वाढले पाहिजेत
अशा परीस्थितीत ही क्रांती साखर कारखाना ऊस उत्पादक सभासदांच्या साथीने सर्व अडचणीवर खंबीरपणे मात करत यावेळी १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे यासाठी ऊस उत्पादक सभासद, शेतकरी हितचिंतकांनी जास्तीत जास्त ऊस क्रांती कारखाण्यास गाळप करण्यासाठी देवून सहकार्य करावे तसेच ऊसाला प्रतिटन जास्तीत जास्त दर देवू असे ते शेवटी म्हणाले
यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले की सहकारी कारखाने अडचणीत आणण्याचे काम शासन करत आहे शासनाने खाजगी कारखाण्यांना सवलती देऊन सहकारी साखर कारखान्यांना जाचक अटीत अडकवले आहे हेच धोरण राहीले तर ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचे हे हक्काचे सहकारी साखर कारखाने अडचणीत येतील याचा विचार करून शासनाने सहकारी साखर कारखान्याना योग्य न्याय द्यावा असे मत व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत प्रास्ताविक कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, यांनी केले तर आभार संचालक तात्यासाहेब वडेर यांनी मानले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार , सत्येश्वर पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक पवार, श्रीकांत लाड, गोविंद डुबल, पोपट फडतरे, प्रमोद मिठारी, धर्मवीर गायकवाड, सोमनाथ घर्णे मोहन मोरे, संभाजी पाटील तसेच ,क्रांती कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद,विविध संस्थांचे पदाधिकारी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰