भिलवडी दि. 1 : सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर 2024 रोजी वाचनालयाच्या सभागृहात दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष माननीय गिरीश चितळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व ग्रंथ पूजन करून संपन्न झाले.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील मराठी साहित्यातील नामवंत दर्जेदार आणि वाचनीय असे शंभर होऊन अधिक अंक मांडण्यात आलेले होते गेली वीस वर्षे सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे शंभर रुपयात 100 दिवाळी अंक वाचा हा उपक्रम सुरू आहे सभासदांना शंभर रुपये भरून सलग सहा महिने हे अंक वाचण्याचा आनंद मिळत असतो यावेळी एमपीएससी परीक्षेत यश मिळवून मंत्रालयात जीएसटी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पूजा माणिक माने यांचा विशेष सत्कार ग्रंथ भेट देऊन करण्यात आला तसेच श्रीमती इंदुताई पाटील आणि देणगीदार कुमार तारे यांचाही ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले मराठी संस्कृतीला आणि दिवाळी सणाला दिवाळी अंकांची फार जुनी आणि दर्जेदार परंपरा आहे वाचनालयाच्या दिवाळी अंक उपक्रमातून सुजाणवाचक घडविण्याचा आणि वाचन चळवळ अधिक प्रभावी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले प्रास्ताविकात श्री कवडे म्हणाले दिवाळी अंकांनी महाराष्ट्रातील नामवंत लेखक कवी घडविलेले आहेत त्यांना व्यासपीठ दिलेले आहे त्यामुळे दिवाळी अंकाचे स्थान मराठी साहित्य मध्ये खूप मोलाचे राहिलेले आहे कदम सर यांनी आभार मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोई उत्तम कांबळे माजी सरपंच चंद्रकांत भाऊ पाटील महावीर चौगुले यांची पाटील गुरुजी जर खूप केळकर हनुमंतराव दिसले महादेव जोशी यांच्यासह सभासद वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदर्शनाचे संयोजन ग्रंथपाल वामन काटीकर लेखनिक विद्या निकम परिगणन विभाग प्रमुख मयुरी नलवडे महादेव काटेकर यांनी उत्तम प्रकारे केले या प्रदर्शनाचा लाभ अनेक सभासद व ग्रामस्थांनी घेतला.
हेही पहा ----
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰