सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जामधील त्रुटी पूर्ततेकरिता दि. 28 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन संशोधन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषि, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी (३ वर्षे / ५ वर्षे विधी) व बी. एड्. इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग तसेच एसईबीसी (मराठा) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण अंतर्गत प्रवेश झाला असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी अर्जही केलेले आहेत. तथापि, छाननीनंतर ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आहेत, अशा अर्जदारांना TEXT MESSAGE तसेच ऑनलाईन प्रणालीतून त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल वर त्रुटी कळविलेली आहे. अशा सर्व अर्जदारांनी त्रुटी पूर्ततेकरिता अद्याप समिती कार्यालयास संपर्क साधला नसल्यास, दि. २८ नोव्हेंबर 2024 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰