सांगली दि. 18 (माध्यम कक्ष) : मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरीक्त (EPIC) इतर 12 प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. मात्र, संबंधिताचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदारांनी आयोगाच्या निर्देशांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरीक्त खालील नमूद कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करू शकतील.
यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोष्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिष्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेव्दारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/सार्वत्रिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र या कागदपत्रांचा समावेश आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰